आर पी आय ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे व राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील यांची पत्रकार परिषद .आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 100 उमेदवारांची यादी जाहीर करणार.
मुंबई - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) या राजकीय पक्षाच्या वतीने दिनांक २३/१०/२०२४ रोजी दुपारी ०१:३० वाजता मराठी पत्रकार संघ,पत्रकार भवन, आझाद मैदान,मुंबई येथे आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
सदर पत्रकार परिषदेस रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.दिपकभाऊ निकाळजे हे संबोधित करणार असून येत्या निवडणुकीत कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार याबाबत भूमिका मांडणार आहेत.यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. मोहनलाल पाटील व महाराष्ट्र महिला अध्यक्षा मा सुनीताई चव्हाण हे देखील विशेष उपस्थित राहणार आहेत.*
*महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने १०० उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार असून पक्षाने १८० जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरी यादी देखील लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.*
Comments
Post a Comment