Posts

Showing posts from October, 2024

पुजा प्रकाश एन.यांना राष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध पुरस्कार स्टीम्युलेटींग फिलींग ऑफ पॅट्रोटिजम राष्ट्रीय अवार्ड प्रदान

Image
जयहिंद सैनिक संस्था, मुंबई जम्मू-कश्मीर डोगरा समाज, युवा सेवा संघ,व सावरकर विचार मंच, यांच्या द्वारा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या पुजा प्रकाश एन. या प्रयाश सहेली मंच व भारत निर्माण आंदोलन माध्यमातुन भारत राष्ट्रात महिला, युवक-युवती यांनी "समृद्ध युवा समृद्ध राष्ट्र"स्वावलंबी महिला स्वावलंबी राष्ट्र " या उद्दीष्टपूर्ती करीता कार्यरत आहेत  त्यातही शेतकरी आत्महत्या प्रमाण असणाऱ्या विदर्भ प्रांतात शेतकरी कुंटुबातील युवकांनी उद्योग, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करून कौटुंबिक प्रगती करावी यासाठी प्रयत्नशील असणारया,तसेच अमरावती जिल्हयातील मेळघाट परिसरात आदिवासी युवकांनी आर्थिक सक्षम व्हावे हा दृष्टीकोण समोर ठेऊन आदिवासी युवकांनी उद्योग क्षेत्रात निपूण व्हावे करीता प्रशिक्षण देऊन प्रेरीत करुन उद्योग करण्यासाठी अर्थ सहाय करणारया,यवतमाळ जिल्ह्यात असलेल्या आदिवासी बहुल क्षेत्रात झरी जामणी व घांटजी तहसील क्षेत्रांतर्गत येणारया गांवामध्ये कुमारी मातांचा प्रश्न मोठया प्रमाणात आहे, कुमारी मांताचे प्रमाण भविष्यात वृद्धि होऊ नये याकरीता कार्य कार्य सुरु आहे तसेच...

संदीप नाईक यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश. 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघातून लढवणार निवडणूक.

Image
बेलापूर - : ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू ठरलेल्या बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपा नेते गणेश नाईक यांचे पुत्र आणि नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांना भाजपला रामराम ठोकला असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. दरम्यान, नवी मुंबईच्या विकासासाठी दिलेला शब्द पाळला गेला नसल्याने त्यांनी पक्ष सोडला असल्याचं म्हटलंय. आज नवी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी पक्षाची (शरद पवार) तुतारी हातीत घेतल्यानंतर संदीप नाईक म्हणाले, “२०१९ मध्ये परिस्थिती निर्माण झाल्याने आम्हाला निर्णय घ्यावा लागला होता. नवी मुंबईच्या विकासासाठी आम्ही निर्णय घेतला. आमच्या नवी मुंबई शहराचं हित साधलं जावं, दीर्घ आणि प्रलंबित विषय सत्तेत असल्याशिवाय निर्णय होत नाही. हे विषय नवी मुंबईच्या हिताचे आहेत, हे मार्गी लागण्याकरता त्यावेळी निर्णय घेतला गेला. परंतु, आम्हाला दिलेला शब्द पाळला गेला नाही. निवडणुका जाहीर झाल्यानंतर दिलेला शब्द फिरवला गेला. त्यामुळे काही अंशी माझी कोंडी झाली. माझी कोंडी झाल...

विधानसभा निवडणूकीत मतदान करण्यासाठी नवी मुंबईत विविध माध्यमांतून आवाहन

Image
नवी मुंबई -  20 नोव्हेंबर रोजी होणा-या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत नवी मुंबईतील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन करण्याच्या दृष्टीने स्वीप अर्थात मतदार जागरूकता कार्यक्रमांतर्गत विविध माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. या अंतर्गत आज दिघा येथील नमुंमपा माध्यमिक शाळा क्र. 108 मध्ये विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व सांगत त्यांच्यामार्फत आई-बाबा व कुटूंबिय आणि शेजारी यांना मतदान करण्याकरिता प्रोत्साहित करण्याचे सांगण्यात आले. तसेच नमुंमपा माध्यमिक शाळा क्र. 113, महापे येथेही मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो या विषयावर रांगोळी व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांमार्फत मतदानाचा संदेश प्रसारित केल्याने त्यांना मतदानाचे महत्व कळतेच शिवाय त्यांच्यामार्फत त्यांच्या आईवडिलांपर्यंत तसेच परिचितांपर्यंत मतदानाचे कर्तव्य पार पाडण्याचा संदेश पोहचतो. नेरूळ विभागात सेक्टर 29 येथील दैनंदिन बाजारामध्ये मतदार जनजागृती पथकाने भेट देत तेथील व्यावसायिक आणि ग्राहक यांच्याशी संवाद साधत त्यांना मतदानाचा हक्क बजावण्याविषयी सांगितले, तसेच याठिकाणी म...

आर पी आय ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे व राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील यांची पत्रकार परिषद .आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 100 उमेदवारांची यादी जाहीर करणार.

Image
मुंबई - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) या राजकीय पक्षाच्या वतीने दिनांक २३/१०/२०२४ रोजी दुपारी ०१:३० वाजता मराठी पत्रकार संघ,पत्रकार भवन, आझाद मैदान,मुंबई येथे आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सदर पत्रकार परिषदेस रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.दिपकभाऊ निकाळजे हे संबोधित करणार असून येत्या निवडणुकीत कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार याबाबत भूमिका मांडणार आहेत.यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. मोहनलाल पाटील व महाराष्ट्र महिला अध्यक्षा मा सुनीताई चव्हाण हे देखील विशेष उपस्थित राहणार आहेत.* *महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने १०० उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार असून पक्षाने १८० जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरी यादी देखील लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.*

विधानसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेचे पालन करीत अनधिकृत जाहिराती, बॅनर्स, होर्डींग्जवर कारवाई

Image
 नवी मुंबई -महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी विविध माध्यमांतून प्रदर्शित करण्यात आलेल्या अनधिकृत जाहिराती हटविण्याची धडाकेबाज कारवाई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहे. यामध्ये 13 ते 16 ऑक्टोबर या 4 दिवसांच्या कालावधीत 4418 इतक्या मोठया संख्येने छोटे - मोठे अनधिकृत बॅनर्स व होर्डींग हटविण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ.राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली सदर मोहीम आठही विभाग कार्यालय स्तरावर युध्दपातळीवर राबविण्यात आलेली असून संबंधित विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या माध्यमातून शासकीय, सार्वजनिक व खाजगी अशा तिन्ही मालमत्तांवर तसेच जागांवर लावण्यात आलेल्या अनधिकृत राजकीय जाहिराती काढून टाकण्यात आलेल्या आहेत. यामध्ये बेलापूर विभागात 391, नेरुळ विभागात 1139, वाशी विभागात 444, तुर्भे विभागात 1005, कोपरखैरणे विभागात 571, घणसोली विभागात 350, ऐरोली विभागात 331, दिघा विभागात 187 अशा प्...

सिद्धांतवादी राजकीय विचारप्रणालीचा ह्रास!- ॲड. पुजा प्रकाश एन.

Image
मुंबई - भूतलावरील मानवीय वसाहत असणाऱ्या कोणत्याही देशात व देशान्तर्गत असलेल्या राज्यामध्ये विशिष्ट प्रकारची विचारधारा असते,व त्या विचारधारा वरचं तो देश तथा राज्य प्रगतीच्या मैलाचे किती शिखरे पादाक्रांत करेल याची मूल्यांकनात्मक छाननी राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय स्तरावर होऊन वर्तमान स्थितित व भविष्यात जगाच्या पाठीवर तो देश किती प्रभावशाली असेल याचे अनुमान काढ़ता येते ,असेच अनुमान आपल्या राष्ट्र व राज्याविषयी करावयाचे ठरल्यास महाराष्ट्र हे सर्वचं बाबतीत आघाडीवर असलेलं राज्य आज वैचारिक तत्वाच्या बाबतीत सत्तेच्या सारीपटाच्या खेळामुळे "एंड ऑफ आयडालाॅजी" च्या वाटेवर जाऊन राष्ट्रीय स्तरावर त्याचे परिणाम किती उग्र असतील याची भिती वाटते ,विचारधारावर आधारित पक्षीय राजकारण आज रसातळाला जातांना महाराष्ट्रातील जनता उघड़या डोळयांनी पाहत आहे ,गेल्या कड़ाही दिवसापासुन तर हे अधिक भयानक झालेले आहे, राजकीय सत्तेच्या कुरघोडीच्या खेळात व सत्ताचं सर्वस्व आहे मग ती कोणत्याही मार्गाने प्राप्त झाली पाहीजे या कुजकट मानसिक विचारापायी या देशातील धर्मनिरपेक्ष, धर्मांध,व बहुजन या सर्वचं विचारधारेचा ...

कापसेवस्ती शाळेचा दीड महिन्यात बदलला लुक. अग्नीपंखचा आपुलकी मिशन उपक्रम

Image
 श्रीगोंदा - अग्निपंख फौंडेशनने  लोकसहभागातून अवघ्या 45 दिवसात श्रीगोंदा येथील जिल्हा परिषदेची कापसेवस्ती शाळेचे सुशोभीकरण केले वाचन प्रेरणा दिनाचे दिवशी लोकार्पण करुन मिसाईलमॅन डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना मानवंदना दिली बदललेली शाळा परिसर पाहुन पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले.  हे लोकार्पण लेखा व वित्त अधिकारी रमेश कासार, गटशिक्षणाधिकारी सत्यजित मच्छिंद्र , नवनाथ दरेकर, नवनाथ खामकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी रमेश कासार यांनी शाळेस पाच हजाराची पुस्तके भेट दिली. यावेळी लोकसहभाग देणाऱ्या देगणीदारांचा अग्नीपंखने सन्मान केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष कापसे होते.   रमेश कासार म्हणाले कि अग्नीपंख फौंडेशनने लोकसहभागातून कापसेवस्ती रुपच बदलून टाकले हे आपुलकी मिशन अंतर्गत हे काम दिशादर्शक ठरणार आहे. पुढील वर्षी कापसे वस्ती शाळेने मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा मध्ये भाग घ्यावा त्या दृष्टीने इतर त्रृटी दुर करुन घ्याव्यात सत्यजित मच्छिंद्र म्हणाले कि कापसेवस्ती शाळेचे काम निस्वार्थ भावनेने झाले अग्नीपंख फौंडेशनच्या टीमने इतर शाळांसा...

PIB press news information bureau short news update

Image
New Dellhi - Press News Information of Bureau Short News update  •Second meeting of Joint Committee under India-UAE CEPA held •DPIIT announces relaxations in Quality Control Order for Cookware, Utensils, and Cans to enhance ease of doing business •Union Minister Shri Jayant Chaudhary Inaugurates National Skill Training Institute Extension Centre at AMTZ Campus, Visakhapatnam •4th Meeting of National Traders’ Welfare Board held in New Delhi •Department of Consumer Affairs observing Special Campaign 4.0 • Notice Inviting Applications for E-Auction of Third Batch of Private FM Radio Phase-III Channels •Central Consumer Protection Authority Issues Guidelines for ‘Prevention and Regulation of Greenwashing and Misleading Environmental Claims’ •Shri Dharmendra Pradhan announces 3 Centres of Excellence in AI in Healthcare, Agriculture and Sustainable Cities •PRESIDENT OF INDIA IN Algeria; HOLDS BILATERAL MEETING WITH PRESIDENT of Algeria and leads delegation level-talks •I...

विधानसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश

Image
  नवी मुंबई -  महाराष्ट्र विधानसभा सार्व‍त्रिक निवडणूक 2024 ची घोषणा करण्यात आली असून मा.भारत निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीस सुरुवात झालेली आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी यांची विशेष आढावा बैठक घेत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.        महाराष्ट्र राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक होत असून आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी पोस्टर्स, फलक, होर्डींग अथवा कोणत्याही स्वरूपात लावलेल्या अनधिकृत राजकीय जाहिराती काढून टाकण्याच्या कार्यवाहीचा विभागनिहाय आढावा घेतला. दोन्ही परिमंडळे व आठही विभाग कार्यालयांनी अतिक्रमण विभागाच्या सहयोगाने सदरची कार्यवाही अधिक गतीमानतेने व त्वरित पूर्ण करावी असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. तसेच निवडणूकीच्या अनुषंगाने करावयाच्या विविध बाबींचा सविस्तर आढावा घेतला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, प्रशासन उपआयुक्त श्री.शरद पवार, निवडणूक उप...