नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सवाप्रसंगी उत्साहाने स्वागत

 नवी मुंबई-  उन्हाळी सुट्टीनंतरचे नमुंमपा कार्यक्षेत्रातील शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष आजपासून उत्साहात सुरू झाले असून शाळेच्या पहिल्या दिवशी ठिकठिकाणी विद्यार्थ्यांइतकेच पालकही उत्साही दिसत होते. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 434 शाळा असून त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या 57 प्राथमिक तसेच 23 माध्यमिक शाळा आहेत. महापालिका क्षेत्रातील काही सीबीएससी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा त्यांच्या वेळापत्रकानुसार याआधीच सुरू झालेल्या आहेत.

आज शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शाळांमध्ये महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, शिक्षण विभागाचे उपआयुक्त श्री. योगेश कडुसकर यांच्या नियंत्रणाखाली अत्यंत उत्साही वातावरणात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून पारंपारिक पध्दतीने स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या विद्यार्थ्यांनी शाळेकडील ढोल - ताशे व लेझीम साहित्याचा उपयोग करून नवीन विद्यार्थ्यांचे वाजत गाजत स्वागत केले. फुलांच्या पाकळ्या उधळून नृत्य करत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गापर्यंत नेण्यात आले.

याप्रसंगी वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण विभागाचे उपआयुक्त श्री. योगेश कडुसकर, शिक्षणाधिकारी श्रीम.अरूणा यादव, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. सुलभा बारघारे व केंद्र समन्वयक तसेच शाळांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, पालक, शिक्षणप्रेमी व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांना गुलाबाचे फूल, चॉकलेट व गोड खाऊ देण्यात आला. नमुंमपा शाळेमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. काही शाळांमध्ये प्रवेशोत्सवाचे औचित्य साधून नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणही करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

ऐश्वर्या राय यांच्या बरोबरीची मिस इंडिया स्पर्धक बॉलीवूड अभिनेत्री बरखा मदन यांनी स्वीकारला बुद्ध धम्म.

सतत यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रिल्स पाहिल्यामुळे मानवी स्मरणशक्तीवर वाईट परिणाम – वैज्ञानिकांचा इशारा

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..