हजारो भीम बांधवांचा जल्लोष ...डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समिती माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर जयंती छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
वाशी नवी मुंबई- दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे येथे विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वा जन्मदिन अर्थातच जयंती उत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी समिती अध्यक्ष राजेंद्र दादा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई प्रांतातील विविध प्रभागांमधील आलेल्या हजारो भीम अनुयायी यांनी एकत्र येऊन भीम जयंतीचा जल्लोष करून आनंद लुटला. या जल्लोषात प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांनीही या संयुक्त जयंती वेळात वेळ काढून भेट दिली तसेच जमलेल्या हजारो भीम बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या व जयंती उत्साहात सहभाग घेतला. त्याचप्रमाणे समिती अध्यक्ष राजेंद्र दादा गायकवाड यांनी संपूर्ण नवी मुंबईमध्ये अशी जयंती दरवर्षी सहाणे जल्लोषात व अजून मोठ्या प्रमाणात दरवर्षी साजरी केली जाईल असे प्रतिपादन केले त्याचप्रमाणे नवी मुंबईतील प्रथमच वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरी करण्यात आलेल्या संयुक्त जयंती यशस्वी करण्यासाठी तन-मन धन अर्पण करून उत्साहाने कार्य केलेल्या सर्व समिती सहकारी कार्यकर्ते तसेच भीम बांधव यांचे मनःपूर्वक आभार मानले.
Comments
Post a Comment