उलवे नगरी मध्ये बौद्ध धम्म परिषद संपन्न
उलवे रायगड - बौद्ध धर्मामुळे भारत महान देश बनेल आणि 'मी सारा भारत बौद्धमय करीन' राष्ट्रनिर्माते डॉ बाबासाहेब यांनी संकल्प केला होता या संकल्पनेतून प्रथमच उलवे नवी मुंबई येथे भव्यदिव्य बौद्ध धम्म परिषद दि. ७ जानेवारी २०२४ रोजी प्लॉट क्र. ०१. सेक्टर २०, संविधान चौक येथे हजारोंच्या संख्येत संपन्न झाली. या परिषदेला, द बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव य. आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी त्यांनी, उपस्थितांना संबोधित केले. त्याचबरोबर बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून डॉ. एस. आर. इंदवंस महाथेरो यांची विशेष उपस्थिती होती. तसेच या बौद्ध धम्म परिषदेला देश विदेशातील भिक्खुसंघ व भिक्खुणी संघासह देशभरातून अनुयायी ही हजारोंच्या संख्येत उपस्थित होते. तसेच वामनदादा वाघमारे अध्यक्ष सचिन गवळे अरुण झनकार प्रा भोसले वनिता कांबळे सचिव बौद्ध धम्म परिषद उलवे, उपासक ,उपासक अरुण झंकार ,आदी कार्यकर्त्यांनी बौद्धधम्म परिषद यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मोलाचे सहाय्य केले व हि धम्म परिषद सफलता पूर्वक पार पाडली.
Comments
Post a Comment