राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार श्री. दिपाली शिरसाठ यांना थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते प्रदान


पारनेर    - पर्यटन,संरक्षण,समाजसेवा,कृषी,शैक्षणिक,क्रीडा,पत्रकारिता,साहित्य, संप्रदाय, कार्यगौरव, अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या विविध समाज बांधव यांना राष्ट्रीय पुरस्कार २०२३ ने आदरणीय अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून IFS,मुख्य वनसंरक्षक,सामाजिक वनीकरण विभागाचे श्री.रंगनाथजी नाईकडे,से.नी.विशेष पोलीस महानिरीक्षक IG श्री.डॉ.विठ्ठलरावजी जाधव, शिर्डी विधानसभा मतदार संघाचे मा.खासदार श्री.भाऊसाहेबजी वाकचौरे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस उप अधिक्षक,फोर्स वन युनिट चे श्री.संतोषजी गायके, अहमदनगर सेवानिवृत्त इंडियन आर्मी जवान तसेच आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे राष्ट्रीय निरीक्षक मा.मेजर महेंद्रजी सोनवणे,सामाजिक कार्यकर्त्या डॉ.श्रीमती अपर्णाताई खाडे, संस्थेच्या राष्ट्रीय महिला निरीक्षक सौ.करुणाजी गगे बांगर तसेच संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री.देवा तांबे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण अधिवेशन कार्यक्रम चे नियोजन संस्थेच्या राष्ट्रीय महिला महासचिव सौ.करुणाजी गगे व संस्थेचे ठाणे जिल्हा अधिकारी कमिटी यांच्या वतीने करण्यात आले होते. यासह सूत्रसंचालन ची जबाबदारी निवेदिका सौ.करुणाजी गगे मॅडम, सौ.नलिनीजी गायकवाड मॅडम तसेच श्री.मुकेशजी दामोदरे यांनी केले.


Comments

Popular posts from this blog

ऐश्वर्या राय यांच्या बरोबरीची मिस इंडिया स्पर्धक बॉलीवूड अभिनेत्री बरखा मदन यांनी स्वीकारला बुद्ध धम्म.

सतत यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रिल्स पाहिल्यामुळे मानवी स्मरणशक्तीवर वाईट परिणाम – वैज्ञानिकांचा इशारा

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..