शरद पवार यांचे विश्वासू आणि प्रामाणिक नेते जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादीच्या विरोधी पक्ष नेते पदी नियुक्ती
मुंबई महाराष्ट्र- आज दिनांक 2 जुलै रविवार रोजी महाराष्ट्रात राबविण्यात आलेल्या ऑपरेशन लोटस या मोहिमेत आणि राजकीय घडामोडी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित दादा पवार यांनी शिंदे भाजपा गट सरकार सोबत हात मिळवत महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याचबरोबर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्षाचे अनेक आमदार यांनाही ते घेऊन गेले याप्रसंगी राष्ट्रवादीतील अनेक ज्येष्ठ व प्रामाणिक नेते यांनी मात्र आदरणीय शरद पवार यांच्यासोबत राहून पक्षाबद्दलचा प्रामाणिकपणे दाखवला याचवेळी ठाणे जिल्ह्यातील वाघ माननीय जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली त्याचप्रमाणे त्यांची पक्षाच्या विप या पदावर देखील नियुक्ती करण्यात आली. जितेंद्र आव्हाड (५९) हे ठाण्यातील मुंब्रा-कळव्याचे तीन वेळा आमदार आहेत. त्यांनी यापूर्वी 2014 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडी सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि फलोत्पादन आणि 2019 ते 2022 पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहनिर्माण आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री म्हणून काम केले आहे. 1984-85 मध्ये सागरी अभियांत्रिकी अभ्यास पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून कार्मिक व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. आव्हाड यांच्याकडे मुंबई विद्यापीठातून डॉक्टरेटही आहे.त्यांनी विद्यार्थी नेता म्हणून सुरुवात केली - आणि ते शरद पवारांच्या प्रभावाखाली आले. ते नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियामध्ये होते आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्षही होते. पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यावर ते त्यात सामील झाले.
Comments
Post a Comment