जाहिरातीच्या माध्यमातून भारतीय समाजमना वर होत असलेल्या वाईट परिणामावर रचलेली विडंबनात्मक रचना...
काजू बदाम सोडून आता
गुटखा प्रसिद्ध झाला
अजय, अक्षय, शाहरूख सुद्धा
विमलच खा म्हणाला
बंद झाल्या शिक्षण जाहिराती
जुगार प्रसिद्ध झाला
हिंदी मराठी कलाकार सुद्धा
रमीच खेळा म्हणाला
बंद झालेत मैदानी खेळ
मोबाईल वेडा झाला
भर त्यात आय पी एल ची
त्यातही जुगार आला
ख्रिस गेल कपिल सुद्धा
केसरच खा म्हणाला
पामोलीव्ह का जबाब नही
तो ही विसरून गेला
जॅकी सुद्धा गायछाप खातो
तो ही तेच म्हणाला
गुटख्या मुळेच धारीवाल सुद्धा
इतका श्रीमंत झाला
जुगार, दारू, सिग्रेट, गुटखा
इतका प्रसिद्ध झाला
कुणीच नाही म्हणत याला
तुम्ही आळा घाला
बरबाद होत आहे तरुण पिढी
समाज व्यसनी झाला
नाचवतो आणून गौतमी पाटील
तरीही नेताच महान झाला
विनंती करतोय एक तुम्हाला
स्वतःलाच बंधने घाला
त्यांच्या होतात जाहिराती आणी
समाज बरबाद झाला
कवी - एक भारतीय
Comments
Post a Comment