महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप अजित दादा महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन सरकार स्थापन- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई महाराष्ट्र - ऑपरेशन लोटसचाच एक भाग असलेल्या या मोहिमेत भाजप सरकार यशस्वी झाले आहे अशी प्रसिद्धी माध्यमांमध्ये चर्चा असताना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला तसेच महाराष्ट्राला एक मोठा राजकीय भूकंप पाहण्यास मिळाला. शपथविधी यशस्वी झाल्यानंतर आज अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज सकाळपासूनच राजकियी हालचालींचा वेग आलेला होता. आधी अजित पवारांनी त्यांच्या समर्थकांसोबत बैठक घेतली. त्यानंतर ते समर्थक आमदारांसह राजभवनात पोहोचले. अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील राजभवनात दाखल झाले होते. त्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी पुन्हा एकदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साथीला आता दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जातीये.
अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
अजित अनंतराव पवार - उपमुख्यमंत्री
छगन भुजबळ - मंत्री
दिलीपराव वळसे पाटील - मंत्री
हसन मुश्रिफ - मंत्री
धनंजय मुंडे - मंत्री
धर्मरावबाबा आत्राम - मंत्री
आदिती तटकरे - मंत्री
संजय बनसोडे - मंत्री
अनिल पाटील - मंत्री
वरील नवीन मंत्री मंडळ विस्तारा सोबतच येणाऱ्या काळात राष्ट्रवादी पक्ष व पक्ष प्रमुख याबाबत काय निर्णय घेतील या विषयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे त्याचप्रमाणे नवीन स्थापन झालेले ट्रिपल इंजिन सरकार महाराष्ट्राचा खराखुरा विकास करतील काय हा महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला प्रश्न आहे. येणाऱ्या काळात या सर्व प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्राच्या जनतेला मिळतील अशी आशा आहे.
Comments
Post a Comment