RAW प्रमुख रवी सिन्हा: IPS रवी सिन्हा 30 जून रोजी गुप्तचर संस्था RAW चे प्रमुख बनतील
नवी दिल्ली - आयपीएस अधिकारी रवी सिन्हा यांची रिसर्च अँड एनालिसिस विंग (RAW) चे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी रवी सिन्हा 30 जून रोजी पदभार स्वीकारतील मिळालेल्या माहितीनुसार, 1988 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा (IPS) छत्तीसगड केडरचे अधिकारी सिन्हा सध्या कॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव म्हणून कार्यरत आहेत. मंत्रिमंडळाने नियुक्तीला मान्यता दिली आहे.मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे की मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सिन्हा यांची दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी रॉचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे.
Comments
Post a Comment