नेरूळ विभागातील वंडर्स पार्क येथील अनियंत्रित स्कायराइडमुळे दुर्घटना सहा नागरिक जखमी.
नवी मुंबई- नुकत्याच 30 मे रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या नूतनीकरण केलेल्या नेरूळ वि भागातील वंडर्स पार्क या उद्यानाचे उद्घाटन झाले नूतनीकरण केलेले या उद्यानामध्ये नागरिकांच्या करमणुकीसाठी अनेक नवीन सुविधा साहित्य तसेच करमणुकीसाठी आधुनिक पार्क यामध्ये ज्याजॉय राइट्स असतात याच धर्तीवर देखील वंडर स्पार्क मध्ये नवीन जॉयराइड्स लावण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक स्कायराइड देखील आहे याच स्कायराइडमुळे हे दुर्घटना घडली यामध्ये राईड चालू असताना अनियंत्रित झाल्यामुळे स्कायराइड जमिनीवरती आढळून सहा नागरिक जखमी झाले त्यापैकी एक नागरिक गंभीर जखमी झालेला आहे असे देखील समजते या सर्व नागरिकांना अपोलो हॉस्पिटल येथे उपचारासाठी भरती करण्यात आले. कोट्यावधी रुपये खर्च करून देखील अशा निकृष्ट दर्जाचे स्कायराइड मुळे नागरिकांना इजा होत असेल अशा राईड चा काय उपयोग असा प्रश्न नागरिकांकडून प्रशासनाला विचारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ही दुर्घटना घडल्यामुळे नेरूळ विभागातील नागरिकांनी या उद्यानास नापसंती दर्शवली आहे. दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी जाऊन चौकशी केल्या नंतर असे समजले की राईड चालू असताना कंत्राटदाराचे प्रोग्रामर प्रोग्रामिंग करत होते त्यावेळी राईड चालू असताना ती खाली येताना थांबली नाही . आणि खालील लोखंडी संरक्षक कठड्याला सर्व पाळणे घासत घासत गेले आणि त्यामध्ये पाच नागरिकांना दुखापत झालेली आहे. एकाची परिस्थिती गंभीर आहे सर्वांना नजिकच्या आपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले आहेत. घटनास्थळी मनपाचे अधिकारी, पोलीस अधिकारी दाखल झाले. त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवरती योग्य कारवाई करण्यात येईल असे नवी मुंबईतील नागरिकांना सुचित केले.
Comments
Post a Comment