ये ग ये ग सरी...नवी मुंबई प्रांतात पाऊसाची हजेरी
नवी मुंबई - नवी मुंबईतील नागरिक सतत वाढणाऱ्या उन्हाळा ऋत्तूतील तापमानामुळे त्रस्त झाले होते. त्याचप्रमाणे पावसाळा ऋतूची ही सर्व नागरिक आतुरतेने वाट पाहत होते. त्यातच हवामान विभागाने दिलेल्या संकेतानुसार कोकण प्रांत आणि महाराष्ट्र मधील अनेक जिल्ह्यामधे पावसाचे आगमन होणार असल्याच्या वृत्तानुसार पावसाने हजेरी लावली. त्यातच बिपरजोय वादळ येणार असल्याचे वृत्त वेधशाळेने सांगितले होते त्यानुसार दुपार पासूनच नवी मुंबईतील प्रांतात जोरदार वादळ आणि धूळ मिश्रित हवा संचार करत होती. साधारण सायंकाळी सहा नंतर नवी मुंबई परिसरातील अनेक ठिकाणी पाऊस पडला आणि नवी मुंबईतील नागरिक सुखावले. त्यानंतर पुन्हा एकदा साधारणता रात्री 11 च्या सुमारास पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. या ऋतूतील पहिल्या पाऊसाचा अनेक बाल वृध्द यांनी आनंद घेतला. तरुण वर्गातील अनेक नागरिकाच्या सोशल मीडिया वर पावसाचे स्टेटस झळकले. यावेळी वर्षा ऋतू वेळेवर आल्याने नवी मुंबई प्रांतातील नागरिक खूष दिसत आहेत.
Comments
Post a Comment