घनसोली विभागात झाडांची खुलेआम कत्तल.
नवी मुंबई : घनसोली येथे अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट झालेला असून याकडे सिडको प्रशासन व नवी मुंबई महानगरपालिका यांचे दुर्लक्ष असल्याने भूमापिया यांची रोजच दिवाळी चालू आहे अनधिकृत बांधकामासाठी मोठमोठी वृक्षांची कत्तल केली जात आहे हाकेच्या अंतरावर असलेले ' फ 'विभाग कार्यालय अतिक्रमण विभाग व गार्डन विभाग हे मूग गिळून गप्प बसलेले आहेत असे दिसून येते दत्तनगर येथील पिंपळाचे मोठे झाड तोडून व त्या ठिकाणावरील पंचशील झेंडा व निळा झेंडा यांची विटंबना करून जवळच असलेल्या अनेक झाडांची कत्तल केलेली आहे याला आशीर्वाद कोणाचा म्हणायचा हे भूमाफिया बाहेरून येऊन अनधिकृत बांधकामे करणे व पर्यावरणाची हानी करणे हे कितपत योग्य वाटते हे स्थानिक घणसोलीकरांनी सांगावे असे स्थानिक परिसरातील जनता बोलत आहे या भू माफियावर महानगरपालिकेकडून व स्थानिक पोलीस स्टेशन वरून कारवाई करावी अशी मागणी स्थानिक करीत आहेत.
Comments
Post a Comment