पाउस आला रे आला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनचे आगमन
महाराष्ट्र - उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण मान्सून महाराष्ट्रात हजेरी लावली. राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. तर मानसूने दक्षिण कोकण प्रदेश व्यापला आहे. या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे. यासोबतच दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याचे समोर आले आहे. येत्या २४ तासात बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे या वादळाचा कोकण किनारपट्टीसह गुजरात किनारपट्टीवरही परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
Comments
Post a Comment