नवी मुंबई पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचा निर्णय बायोमेट्रिक प्रणाली नुसारच वेतन
नवी मुंबई -नवी मुंबई महापालिकेचे कर्मचारीआणि अधिकारी यांचे वेतन जून महिन्यापासून बायोमेट्रीक हजेरी
पत्रकानुसारच करण्यात येणार आहे, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेशनार्वेकर यांनी दिली. यामुळे सकाळी कार्यालयात येऊन हजेरी लावून पसार होणारे कामचुकार कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर आळा बसणार आहे. यासंदर्भात आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकामध्ये म्हटले आहे की,महानगरपालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन यापुढे बायोमेट्रीक हजेरीनुसारच नियंत्रण ठेवत असतात. विनाअनुमती आणि सुट्टी संमत नसतांना अनुपस्थित रहाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन न काढणे यासह अन्य बाबींच्या नियंत्रणाकरीता प्रत्येक महिन्याच्या वेतन देयकासोबत विभागप्रमुखांनी हजेरी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
Comments
Post a Comment