दीर्घ प्रलंबित नवी मुंबई मेट्रोची यशस्वी पुनश्च चाचणी
नवी मुंबई - अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली नवी मुंबई मेट्रोची ची पुन्हा एकदा यशस्वी चाचणी सिडको प्रशासनाकडून घेण्यात आली. यावेळी सिडको प्रशासनाकडून घेण्यात आलेली नवी मुंबई मेट्रोची चाचणी दीर्घ कालावधी करता म्हणजेच रेग्युलर मेट्रो इंटरवल्स या मापदंडानुसार घेण्यात आली. या यशस्वी मेट्रोच्या चाचणीनंतर लवकरच नवी मुंबईतील मेट्रो रेल्वेचा फेज वन बेलापूर ते खारघर येथे सुरू होईल असे सिडकोकडून सांगण्यात येत आहे. बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या या मेट्रो प्रकल्पाला हिरवा कंदील कधी मिळणार असा प्रश्न नवी मुंबईतील नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. त्याच प्रमाणे दीर्घ काळ प्रलंबित झालेल्या या कंत्राटदाराला दंड लावण्यात येईल का अशीही चर्चा प्रसिद्धी माध्यमांमध्ये रंगली आहे. लवकरच या बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाला कोणत्या क्षणी हिरवा कंदील मिळेल याची नवी मुंबई तील नागरिकांना उत्सुकता लागली आहे.
Comments
Post a Comment