मिशनरी स्कूल सेंट लॉरेन्स शाळेत जय श्रीराम वर बंदी 6 विद्यार्थ्याचे निलंबन
वाशी नवी मुंबई -नवी मुंबईतील वाशीच्या सेंट लॉरेन्स शाळेमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी सकाळी दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वॉशरूममध्ये जय श्री रामच्या घोषणा दिल्याने त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे. दहा ते बारा विद्यार्थ्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या होत्या त्यापैकी सहा जणांना काढून टाकल्याचा प्रकार घडला. यानंतर मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सेंट लॉरेन्स शाळेबाहेर मनसेचं आंदोलन सुरू आहे. जय श्री रामच्या घोषणा दिल्याने शाळेकडून विद्यार्थ्यांचं निलंबन करण्यात आल्यानं मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणी मनसेचे कार्यकर्ते शाळा प्रशासनाविरोधात आक्रमक झाल्याचे पाहिला मिळाले आणि त्यांनी घोषणाबाजीही केली."जय श्रीराम " च्या घोषणा दिल्याबद्दल शाळेतून काढून टाकल्याचे समजले , या घटनेबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पक्ष, सकल हिंदू समाज श्री शिवप्रतिष्ठान या संस्थांचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिकांसमवेत शाळेच्या प्राचार्यांची भेट घेवून निवेदन दिले. प्राचार्यांनी सदर विद्यार्थांचे निलंबन आम्ही करणार नाही असे आश्वासन दिले. परंतू जर विद्यार्थ्यांसोबत अन्याय झाल्यास किंवा विद्यार्थ्यांना शाळेतून काढल्यास भारतीय जनता पक्ष, सकल हिंदू समाज आणि श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरीक व कार्यकर्ते, मोठ्या प्रमाणात निषेध आंदोलन करू असा ईशारा स्थानिक भाजपा पदाधिकारी यांनी यांच्यामार्फत देण्यात आला.
Comments
Post a Comment