अतिवृष्टी व आपत्कालीन परिस्थितीत 1800222309 पालिकेच्या टोल फ्री क्रमांकास संपर्क साधा पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचे आवाहन
नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिकेने पावसाळा कालावधीत नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याबाबत दक्षता घेतली असून नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर सर्व परिस्थिती नियंत्रणात राहील याकडे स्वत: लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे नागरिकांनी अडचणीच्या प्रसंगी घाबरून न जाता नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा अथवा महापालिका मुख्यालयातील मुख्य नियंत्रण कक्षाशी 022 – 27567060 / 7061 या दूरध्वनी क्रमांकाशी अथवा 1800222309 / 10 या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment