नेरुळ सेक्टर 16 ए मधील अनधिकृत इमारतीवर पालिका केव्हा करणार कारवाई?
नवी मुंबई - सॅटेलाइट सिटी नवी मुंबई शहर आधुनिक स्मार्ट सिटी अंतर्गत नवीन प्रकल्प घेऊन येत आहे तसेच नियोजित आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळ ही येत आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई स्मार्ट सिटी शहराच्या यादीत काही अनधिकृत इमारती देखील आहेत. नवी मुंबई शहरातील सर्वात मोठा प्रभाग म्हणून गणला जाणाऱ्या नेरूळ प्रभागात सेक्टर सोळा ए मध्ये अनधिकृत इमारत आहे. अनधिकृत इमारतींच्या यादीत ही इमारत आहे . गेली दहा वर्षे ही इमारत उभी आहे, पण कोणाच्या आशीर्वादाने ही इमारत इतकी वर्षे उभी आहे हा स्थानिक नागरिकांना प्रश्न पडला आहे. तसेच नेरूळ प्रभागातील विभागीय अधिकाऱ्यांना संबंधित इमारतींवर कारवाई करण्यास सांगितले आहे दुसरीकडे, ज्यांनी या इमारतीत फ्लॅट घेतले आहेत, त्यांचे काय होणार, ते कुठे राहतील आणि त्यांच्या कष्टाने कमावलेले घर डोळ्यांसमोर कोसळल्यावर त्यांचे काय होणार? या अनधिकृत इमारतीत सदनिका खरेदी करणाऱ्या स्मार्ट सिटी नवी मुंबईतील रहिवाशांना न्याय मिळणार का, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment