Posts

26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन आणि या दिवशी भारतीय संविधानाने सर्व भारतीयांना दिलेले मूलभूत हक्क आणि अधिकार

Image
26 जानेवारी अर्थात भारतीय प्रजासत्ताक दिना दिवशी लिहिलेला विशेष संपादकीय लेख (लेखक संपादक - प्रतिक यादव)  = 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांस दिलेले मूलभूत हक्क आणि अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकांना माहित असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतात प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी का साजरा केला जातो ? - प्रजासत्ताक अर्थातच प्रजेचे व जनतेचे राष्ट्र याच अनुषंगाने भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश इंग्रज सरकार यांच्या पार तंत्रातून मुक्त होऊन स्वतंत्र झाला कालांतराने भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली त्याच्या अनुषंगाने 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान स्वीकारले गेले लागू झाले व भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक देश म्हणून स्थापित झाला या कारणामुळे 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो.  26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व काय आहे?  - 26 जानेवारी 1950 पासून भारतामध्ये संविधान लागू झाले व भारताच...

नवी मुंबई पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशाने वायु आणि धूळ प्रदूषण करणाऱ्या बिल्डरांवर पालिकेची कारवाई ..दीड कोटीची दंड वसुली तसेच अनेकांना स्टॉप वर्क नोटीस काढण्याचा इशारा

Image
  नवी मुंबई - नवी  मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये बांधकामाच्या ठिकाणी सुरु असलेल्या कामांमध्ये बेसमेंटच्या खोदकामामुळे  मोठया प्रमाणात ध्वनी व वायू प्रदूषण होते. याबाबत अलिकडेच मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी स्वत:हून दाखल करुन घेतलेल्या Suo-moto (PIL No. 3/2023) मध्ये दि.11 डिसेंबर 2023 रोजी पारित केलेल्या आदेशानुसार वायू व ध्वनी प्रदूषण कमी करण्याबाबत आदेशित केलेले आहे.        त्यानुसार मा. उच्च न्यायालयाकडील दि. 11 डिसेंबर 2023 रोजीचे आदेश तसेच वायू व ध्वनी प्रदूषण आणि ब्लास्टींगच्या अनुषंगाने नागरिकांकडून नवी मुंबई महानगरपालिकेस प्राप्त होत असलेल्या तक्रारी विचारात घेता त्यावर कायम स्वरुपी तोडगा काढण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त्‍ डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व मान्यतेन  “मानक कार्यप्रणाली” (“Standard Operating Procedure”) (SOP) तयार करुन दि. 1 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. त्या मानक कार्यप्रणालीची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात अंर्तभूत नवी मुंबई महानगर...

संपादकीय लेख - क्रोनिकल कॅपिटलिझम प्रगतशील भारतीय अर्थव्यवस्थेला लागलेली किड आणि धोका

क्रॉनिकल कॅपिटलिझम: देशाच्या विकासाला अडथळा भांडवलदारांसाठी मेजवानी आणि सामान्य जनतेसाठी मृगजळ  संपादकीय लेख - 21 व्या शतकातील प्रगतशील भारताच्या वर्तमान काळातील अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून मी लिहिलेला रिसर्च आर्टिकल कृपया आपण सर्वांनी वाचून यावर आपली मते नोंदवावी अशी विनंती - लेखक संपादक प्रतिक यादव क्रॉनिकल कॅपिटलिझम म्हणजे काय? क्रॉनिकल कॅपिटलिझम हा आर्थिक व्यवस्थेतील असा प्रकार आहे, ज्यामध्ये सरकारी धोरणे, नियम आणि सुविधा विशिष्ट उद्योगपती किंवा गटांसाठी आखली जातात. या व्यवस्थेत भांडवलशाहीचा प्रभाव इतका वाढतो की आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेली समान संधी कमी होते आणि संपूर्ण अर्थव्यवस्था काही मोजक्या लोकांच्या फायद्यासाठी कार्य करते. जसे की आत्ताची अर्थव्यवस्था पाहता मोजके A star उद्योजक अडाणी व अंबानी यांना झुकते माप देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी योजना आखल्या जात आहेत. अर्थतज्ञ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भांडवलशाहीला अर्थातच कॅपिटलिस्ट यांना केलेला विरोध  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून भारत देशातील सर्व घटकांना समान संधी व समान न्याय व समान हक्क...