Posts

Sujata Saunik : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती, इतिहासात पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची निवड

Image
मुंबई  : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक  (Sujata Saunik IAS) यांची नियुक्ती झाली असून ते या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी असतील. सुजाता सौनिक या 1987 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सुजाता सौनिक याचे पती मनोज सौनिक यांनीदेखील राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे.  सुजाता सौनिक यांनी या आधी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यानंतर आता त्यांना मुख्य सचिवपदाची संधी मिळाली आहे. सुजाता सौनिक यांना मुख्य सचिवपदाचा एक वर्षांचा कार्यकाळ लाभणार असून जून 2025 मध्ये त्या निवृत्त होणार आहेत. रविवारी संध्याकाळी 5 वाजता मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून त्या सूत्रे हाती घेणार आहेत. पती आणि पत्नी मुख्य सचिव सुजाता सौनिक या राज्याच्या वरिष्ठ अधिकारी असून त्या निवृत्त आयएएस अधिकारी मनोज सौनिक यांच्या पत्नी आहेत. या आधी मनोज सौनिक यांनीही राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम केलंय. सुजाता सौनिक यांच्या नियुक्तीमुळे आता पती आणि पत्नी मुख्य सचिव होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.  नितीन करीर यांना तीन महिन्यांचा अतिरिक्त कार...

नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सवाप्रसंगी उत्साहाने स्वागत

Image
 नवी मुंबई-  उन्हाळी सुट्टीनंतरचे नमुंमपा कार्यक्षेत्रातील शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष आजपासून उत्साहात सुरू झाले असून शाळेच्या पहिल्या दिवशी ठिकठिकाणी विद्यार्थ्यांइतकेच पालकही उत्साही दिसत होते. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 434 शाळा असून त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या 57 प्राथमिक तसेच 23 माध्यमिक शाळा आहेत. महापालिका क्षेत्रातील काही सीबीएससी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा त्यांच्या वेळापत्रकानुसार याआधीच सुरू झालेल्या आहेत. आज शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शाळांमध्ये महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, शिक्षण विभागाचे उपआयुक्त श्री. योगेश कडुसकर यांच्या नियंत्रणाखाली अत्यंत उत्साही वातावरणात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून पारंपारिक पध्दतीने स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या विद्यार्थ्यांनी शाळेकडील ढोल - ताशे व लेझीम साहित्याचा उपयोग करून नवीन विद्यार्थ्यांचे वाजत गाजत स्वागत केले. फुलांच्या पाकळ्या उधळून नृत्य करत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्य...

लोकसभा निवडणुक २०२४ एक परिमार्श! "संविधान वाचलं पाहिजे...संविधान वाचलंच पाहिजे.? - ॲड.पुजा प्रकाश एन.

Image
मुंबई - लोकशाही मध्ये लोकनियुक्त लोकप्रतिनिधिचं सरकार हा लोकशाही चा आत्मा असतो असा हा लोकशाही चा आत्मा २०२४ च्या १८ व्या लोकसभा निवडणुकीचा टप्पा पार करून संसदेमध्ये सरकारपंथी तत्वास दुर सारुण सरकार पदी नियुक्त झाला,स्वातंत्र्याची सत्याहत्तरी पार करत असतांना आझादी का अमृत महोत्सव ही आपण स्वाभिमानाने साजरा केला,पुंढील वर्षी आपण संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करु ,संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षांत आपण प्रवेश करत असतांना १८ वी लोकसभा निवडणुक महत्वपूर्ण ठरते कारण कधी नव्हे ते या वर्षी झालेली लोकसभा निवडणुक संविधानाभोवती फिरली "संविधान वाचलं पाहिजे" या एका तीन अक्षरी शब्दांच्या वाक्यावर १८ वि लोकसभा निवडणुक लढल्या गेली निवडणुक प्रचार काळादरम्यान निवडणुकीत सहभागी झालेल्या समाजवादी, धर्मनिरपेक्ष, धर्मांध,पुरोगामी,प्रतिगामी,अशा विविध विचारधारा असलेल्या राजकीय पक्षांनी पक्षाच्या जाहिरनामा वर भाषणं करण्याऐवजी..संविधान नष्ट होणार ते वाचलं पाहिजे... यावर अधिक प्रमाणात बोलल्या गेलं,तर शालेय शिक्षणात मनुस्मृति च्या काही श्लोकांचा समावेश करावा अशा आशयाचं नोटीफिकेशन प्रगतिशील महा...

भारतीय राजकारणात महिलांचा सहभाग समप्रमाणात वाढायला हवा एडवोकेट पुजा प्रकाश एन यांनी पत्रकार परिषदेत केले आवाहन

Image
मुंबई - भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात सृदृढ़ लोकशाही म्हणून गणना होते गेल्या सात दशकाचा मागोवा घेतला तर भारतात कार्यपालीका व राजकीय व्यवस्थेमध्ये स्थान मिळवणेकरीता महिलांना खुप मोठा संघर्ष करावा लागला लढा उभारावा लागला या लढ्याचे फलीत म्हणजे महिलांना कार्यपालीका व्यवस्था मध्ये ३३%आरक्षण प्राप्त झाले,व पुढे महिला आरक्षण विधेयकाची १२८वी घटना दुरुस्ती लोकसभा व राज्यसभेत मंजूर झाली तरी प्रत्यक्ष अमलात येण्याची कालमर्यादा निश्चित नाही. कारण जनगणना, त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना ही सारी प्रक्रिया पार पडल्यावरच महिला आरक्षण प्रत्यक्षात अमलात येईल. पण महिला आरक्षणाचा मुद्दा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून चर्चेत आहे. सर्वांत आधी स्थानिक स्वराज्य संस्थेत महिला आरक्षण मिळालं. त्यानंतर, आता हा प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेपर्यंत पोहोचला आहे.  या लढ्याचे व्यापक स्वरुप म्हणजे राजकीय क्षेत्रात सुद्धा स्थानीक स्वराज्य संस्था मध्ये ५०%आरक्षण मिळाले हि बाब स्वागतार्हचं आहे,महिलांच्या सन्मानाची ही खरी सुरवात आहे पण हेच प्रमाण विधानसभा व लोकसभा या ठिकाणी का नाही,आज जवळपास प्रत्येक ...

हजारो भीम बांधवांचा जल्लोष ...डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समिती माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर जयंती छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

Image
वाशी नवी मुंबई- दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे येथे विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वा जन्मदिन अर्थातच जयंती उत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी समिती अध्यक्ष राजेंद्र दादा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई प्रांतातील विविध प्रभागांमधील आलेल्या हजारो भीम अनुयायी यांनी एकत्र येऊन भीम जयंतीचा जल्लोष करून आनंद लुटला. या जल्लोषात प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांनीही या संयुक्त जयंती वेळात वेळ काढून भेट दिली तसेच जमलेल्या हजारो भीम बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या व जयंती उत्साहात सहभाग घेतला. त्याचप्रमाणे समिती अध्यक्ष राजेंद्र दादा गायकवाड यांनी संपूर्ण नवी मुंबईमध्ये अशी जयंती दरवर्षी सहाणे जल्लोषात व अजून मोठ्या प्रमाणात दरवर्षी साजरी केली जाईल असे प्रतिपादन केले त्याचप्रमाणे नवी मुंबईतील प्रथमच वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरी करण्यात आलेल्या संयुक्त जयंती यशस्वी करण्यासाठी तन-मन धन अर्पण करून उत्साहाने कार्य केलेल्या सर्व समिती ...

नवी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जनतेसाठी खुला प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते उद्घाटन

Image
नवी मुंबई - प्रधान मंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईत देशातील सर्वात मोठ्या सागरी पुल अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूचे आज उद्घाटन झाले. हा जगातील 12वा तर देशातील सर्वात मोठा सागरी पुल आहे. यामुळे मुंबईच्या वाहतूकीत मोठा बदल होणार आहे. इतकेच नाही तर मुंबईचे नवी मुंबई, पुणे, गोवा आणि दक्षिणेकडील राज्यांचे अंतर कमी होणार आहे. शिवडी-न्हावा-शेवा अटल सेतूची पायाभरणी डिसेंबर 2016 मध्ये मोदींच्या हस्ते ठेवण्यात आली होती. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) 17 हजार कोटी रुपये खर्चून या जवळपास 22 किमी लांबीच्या सेतूची उभारणी केली आहे. त्यातील 16 किमीचा भाग समुद्रावर असून देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी पूल ठरला आहे. 21.8 किमीचा सेतू असून त्यापैकी 16.5 किमी समुद्रावर तर 5.5 किमी जमिनीवर आहे. देशातील सर्वात लांब सागरी सेतू म्हणून हा सेतू ओळखला जाईल. या सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर फक्त 20 मिनिटांत पार करता येणार आहे. अटल सेतूवरून 100 किमी प्रतितास वेगाने प्रवास करता येणार आहे. अवजड वाहने, दुचाकी, रिक्षा, ट्रॅक्टर यांना या मार्गावरुन परवानगी नसेल. अट...

उलवे नगरी मध्ये बौद्ध धम्म परिषद संपन्न

Image
उलवे रायगड -  बौद्ध धर्मामुळे भारत महान देश बनेल आणि 'मी सारा भारत बौद्धमय करीन' राष्ट्रनिर्माते डॉ बाबासाहेब यांनी संकल्प केला होता या संकल्पनेतून प्रथमच उलवे नवी मुंबई येथे भव्यदिव्य बौद्ध धम्म परिषद दि. ७ जानेवारी २०२४ रोजी प्लॉट क्र. ०१. सेक्टर २०, संविधान चौक येथे हजारोंच्या संख्येत संपन्न झाली. या परिषदेला, द बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव य. आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी त्यांनी, उपस्थितांना संबोधित केले. त्याचबरोबर बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून डॉ. एस. आर. इंदवंस महाथेरो यांची विशेष उपस्थिती होती. तसेच या बौद्ध धम्म परिषदेला देश विदेशातील भिक्खुसंघ व भिक्खुणी संघासह देशभरातून अनुयायी ही हजारोंच्या संख्येत उपस्थित होते. तसेच वामनदादा वाघमारे अध्यक्ष सचिन गवळे अरुण झनकार प्रा भोसले वनिता कांबळे सचिव बौद्ध धम्म परिषद उलवे, उपासक ,उपासक अरुण झंकार ,आदी कार्यकर्त्यांनी बौद्धधम्म परिषद यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मोलाचे सहाय्य केले व हि धम्म परिषद सफलता पूर्वक पार पाडली.