Posts

भारतीय राजकारणात महिलांचा सहभाग समप्रमाणात वाढायला हवा एडवोकेट पुजा प्रकाश एन यांनी पत्रकार परिषदेत केले आवाहन

Image
मुंबई - भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात सृदृढ़ लोकशाही म्हणून गणना होते गेल्या सात दशकाचा मागोवा घेतला तर भारतात कार्यपालीका व राजकीय व्यवस्थेमध्ये स्थान मिळवणेकरीता महिलांना खुप मोठा संघर्ष करावा लागला लढा उभारावा लागला या लढ्याचे फलीत म्हणजे महिलांना कार्यपालीका व्यवस्था मध्ये ३३%आरक्षण प्राप्त झाले,व पुढे महिला आरक्षण विधेयकाची १२८वी घटना दुरुस्ती लोकसभा व राज्यसभेत मंजूर झाली तरी प्रत्यक्ष अमलात येण्याची कालमर्यादा निश्चित नाही. कारण जनगणना, त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना ही सारी प्रक्रिया पार पडल्यावरच महिला आरक्षण प्रत्यक्षात अमलात येईल. पण महिला आरक्षणाचा मुद्दा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून चर्चेत आहे. सर्वांत आधी स्थानिक स्वराज्य संस्थेत महिला आरक्षण मिळालं. त्यानंतर, आता हा प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेपर्यंत पोहोचला आहे.  या लढ्याचे व्यापक स्वरुप म्हणजे राजकीय क्षेत्रात सुद्धा स्थानीक स्वराज्य संस्था मध्ये ५०%आरक्षण मिळाले हि बाब स्वागतार्हचं आहे,महिलांच्या सन्मानाची ही खरी सुरवात आहे पण हेच प्रमाण विधानसभा व लोकसभा या ठिकाणी का नाही,आज जवळपास प्रत्येक ...

हजारो भीम बांधवांचा जल्लोष ...डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समिती माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर जयंती छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

Image
वाशी नवी मुंबई- दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे येथे विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वा जन्मदिन अर्थातच जयंती उत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी समिती अध्यक्ष राजेंद्र दादा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई प्रांतातील विविध प्रभागांमधील आलेल्या हजारो भीम अनुयायी यांनी एकत्र येऊन भीम जयंतीचा जल्लोष करून आनंद लुटला. या जल्लोषात प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांनीही या संयुक्त जयंती वेळात वेळ काढून भेट दिली तसेच जमलेल्या हजारो भीम बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या व जयंती उत्साहात सहभाग घेतला. त्याचप्रमाणे समिती अध्यक्ष राजेंद्र दादा गायकवाड यांनी संपूर्ण नवी मुंबईमध्ये अशी जयंती दरवर्षी सहाणे जल्लोषात व अजून मोठ्या प्रमाणात दरवर्षी साजरी केली जाईल असे प्रतिपादन केले त्याचप्रमाणे नवी मुंबईतील प्रथमच वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरी करण्यात आलेल्या संयुक्त जयंती यशस्वी करण्यासाठी तन-मन धन अर्पण करून उत्साहाने कार्य केलेल्या सर्व समिती ...

नवी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जनतेसाठी खुला प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते उद्घाटन

Image
नवी मुंबई - प्रधान मंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईत देशातील सर्वात मोठ्या सागरी पुल अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूचे आज उद्घाटन झाले. हा जगातील 12वा तर देशातील सर्वात मोठा सागरी पुल आहे. यामुळे मुंबईच्या वाहतूकीत मोठा बदल होणार आहे. इतकेच नाही तर मुंबईचे नवी मुंबई, पुणे, गोवा आणि दक्षिणेकडील राज्यांचे अंतर कमी होणार आहे. शिवडी-न्हावा-शेवा अटल सेतूची पायाभरणी डिसेंबर 2016 मध्ये मोदींच्या हस्ते ठेवण्यात आली होती. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) 17 हजार कोटी रुपये खर्चून या जवळपास 22 किमी लांबीच्या सेतूची उभारणी केली आहे. त्यातील 16 किमीचा भाग समुद्रावर असून देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी पूल ठरला आहे. 21.8 किमीचा सेतू असून त्यापैकी 16.5 किमी समुद्रावर तर 5.5 किमी जमिनीवर आहे. देशातील सर्वात लांब सागरी सेतू म्हणून हा सेतू ओळखला जाईल. या सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर फक्त 20 मिनिटांत पार करता येणार आहे. अटल सेतूवरून 100 किमी प्रतितास वेगाने प्रवास करता येणार आहे. अवजड वाहने, दुचाकी, रिक्षा, ट्रॅक्टर यांना या मार्गावरुन परवानगी नसेल. अट...

उलवे नगरी मध्ये बौद्ध धम्म परिषद संपन्न

Image
उलवे रायगड -  बौद्ध धर्मामुळे भारत महान देश बनेल आणि 'मी सारा भारत बौद्धमय करीन' राष्ट्रनिर्माते डॉ बाबासाहेब यांनी संकल्प केला होता या संकल्पनेतून प्रथमच उलवे नवी मुंबई येथे भव्यदिव्य बौद्ध धम्म परिषद दि. ७ जानेवारी २०२४ रोजी प्लॉट क्र. ०१. सेक्टर २०, संविधान चौक येथे हजारोंच्या संख्येत संपन्न झाली. या परिषदेला, द बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव य. आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी त्यांनी, उपस्थितांना संबोधित केले. त्याचबरोबर बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून डॉ. एस. आर. इंदवंस महाथेरो यांची विशेष उपस्थिती होती. तसेच या बौद्ध धम्म परिषदेला देश विदेशातील भिक्खुसंघ व भिक्खुणी संघासह देशभरातून अनुयायी ही हजारोंच्या संख्येत उपस्थित होते. तसेच वामनदादा वाघमारे अध्यक्ष सचिन गवळे अरुण झनकार प्रा भोसले वनिता कांबळे सचिव बौद्ध धम्म परिषद उलवे, उपासक ,उपासक अरुण झंकार ,आदी कार्यकर्त्यांनी बौद्धधम्म परिषद यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मोलाचे सहाय्य केले व हि धम्म परिषद सफलता पूर्वक पार पाडली.

नेरूळ विभागातील उद्यान अधिकारी श्री दीपक रोहेकर यांचा समारोप

Image
नेरूळ - नवी मुंबई शहरातील गजबजलेल्या अशा नेरूळ नगरातील उद्यान अधिकारी श्री दीपक रोहेकर यांची घनसोली घणसोली विभागात पदभार देण्यात आला. साधारणता त्यांच्या पाच वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी नेहरू नगरातील अनेक उद्यानांचा कायापालट केला व काळजीपूर्वक लक्ष देऊन नेरूळ सेक्टर 11 मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे परिवर्तन केले व अत्यंत मनमोहक व सुशोभनीय उद्यानांमध्ये या उद्यानाची ख्याती निर्माण केली. नवी मुंबई शहरातील सर्वात मोठे नगर म्हणून नेरूळ या नगराची विभागाचे नोंद केले जाते या विभागात एकूण 36 उद्याने आहेत त्यापैकी अनेक उद्यानांचा त्यांनी विकास केला प्रसंगी या उद्यानात येणाऱ्या शेकडो नागरिकांनी त्यांच्या कामाची स्तुती केली व त्यांची प्रशंसा केली व नवीन वर्षाची सुरुवात होत असताना जेव्हा नागरिकांना उद्यान अधिकारी यांची घणसोली विभागात बदली झालेली असल्याची बातमी समजतात त्यांनी त्यांना समारोप दिला व नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या याप्रसंगी नवी मुंबईतील समाजसेवक श्री सुदत्त खरात , युवा नेतृत्व तेजस फणसे , परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतीक यादव व सुरक्षारक्षक संदेश निकाळजे हे ...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद चंद्र पवार यांच्या बद्दल आक्षेपार्य व्यक्तव्य केल्याच्या निषेधार्थ नेरूळ पोलीस स्टेशन येथे राकाँपा नवी मुंबई समितीचे निवेदन

Image
नेरूळ नवी मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबईच्या वतीने आज नेरूळ पोलीस स्टेशन येथे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत रामदास पाटील तसेच नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्ष सौ. सलुजा संदीप सुतार यांच्या आदेशानुसार नेरूळ तालुक्याच्या वतीने विशाल गोराडे नावाच्या व्यक्तीने  आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर अक्षेपाऱ्य वक्तव्य केल्याबद्दल नेरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. तानाजी भगत साहेब यांच्याकडे तक्रार नोंदवण्यात आले. यावेळी सोशल मीडिया सेलचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. तेजस उत्तम फणसे, नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्ष सौ. सलुजा संदीप सुतार, नवी मुंबई मच्छीमार सेलचे जिल्हाध्यक्ष श्री. राहुल म्हात्रे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा चिटणीस राज सुतार, बेलापूर विधानसभा अध्यक्ष - मच्छीमार सेलचे श्री. प्रवीण पाटील, नवी मुंबई महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ साधना बर्गे, नेरूळ तालुका महिला अध्यक्ष सौ. शालिनीताई म्हात्रे, नेरूळ (पूर्व) तालुका अध्यक्ष नरेश कालेकर, नेरूळ (पश्चिम) तालुका अध्यक्ष श्री. रघुनाथ गोळे, नेरूळ युवक तालुका अध्यक्ष जयेश चव्हाण, नेरू...

डॉ. शिवा मुदगीरे यांची भाजप चित्रपट सेनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती

Image
मुंबई - 11 डिसेंबर रोजी भारतीय जनता पक्षाच्या चित्रपट विभागाने राज्यस्तरीय समितीची नियुक्ती केली आहे. या मंडळाच्या समितीवर विविध उद्योगांचा अनुभव असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांची नोंद घेण्यात आली. सोशल मीडिया चित्रपट इत्यादींना भारतीय जनता पक्ष चित्रपत कामगार आघाडी या नावाने चित्रपट विभाग मंडळ म्हणून नियुक्त केले गेले. भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा चित्रपट आघाडीचे नवनियुक्त पदाधिकारी व नियुक्ती समारंभ व नवनियुक्त प्रदेशाध्यक्षांची बैठक कार्यकारिणीची बैठक महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी कार्यालय, नरिमन पॉइंट, मुंबई येथे झाली.  चालू कार्यक्रमाला प्रामुख्याने भाजपा महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी, कामगार आघाडी अध्यक्ष विजय हुरगुडे जी यांच्या मार्गदर्शनाखाली व चित्रपत आघाडीचे अध्यक्ष समीर दीक्षित विक्रांतजी पाटील सचिव भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाला समीर दीक्षित भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता मोर्चा, प्रसिद्ध दिग्दर्शक एन.चंद्रा, अभिनेत्री किशोरी शहाणे यांचीही उपस्थिती होती. प्रख्यात सामाज...