नेरूळ विभागातील उद्यान अधिकारी श्री दीपक रोहेकर यांचा समारोप

नेरूळ - नवी मुंबई शहरातील गजबजलेल्या अशा नेरूळ नगरातील उद्यान अधिकारी श्री दीपक रोहेकर यांची घनसोली घणसोली विभागात पदभार देण्यात आला. साधारणता त्यांच्या पाच वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी नेहरू नगरातील अनेक उद्यानांचा कायापालट केला व काळजीपूर्वक लक्ष देऊन नेरूळ सेक्टर 11 मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे परिवर्तन केले व अत्यंत मनमोहक व सुशोभनीय उद्यानांमध्ये या उद्यानाची ख्याती निर्माण केली. नवी मुंबई शहरातील सर्वात मोठे नगर म्हणून नेरूळ या नगराची विभागाचे नोंद केले जाते या विभागात एकूण 36 उद्याने आहेत त्यापैकी अनेक उद्यानांचा त्यांनी विकास केला प्रसंगी या उद्यानात येणाऱ्या शेकडो नागरिकांनी त्यांच्या कामाची स्तुती केली व त्यांची प्रशंसा केली व नवीन वर्षाची सुरुवात होत असताना जेव्हा नागरिकांना उद्यान अधिकारी यांची घणसोली विभागात बदली झालेली असल्याची बातमी समजतात त्यांनी त्यांना समारोप दिला व नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या याप्रसंगी नवी मुंबईतील समाजसेवक श्री सुदत्त खरात , युवा नेतृत्व तेजस फणसे , परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतीक यादव व सुरक्षारक्षक संदेश निकाळजे हे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय योग दिन वाशीमध्ये उत्साहात साजरा – वनमंत्री आणि प्रशासक यांचा संयुक्त योगा......कार्यक्रमाचे विशेष आकर्षण

सुनील पारकर यांचे आयुक्तांना निवेदन... कोपरखैरणे येथील चिकनेश्वर उद्यानाच्या प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी विनंती

Global music Star Holly natasja Live on News now.