Posts

पर्यावरण प्रेमी सुनील करपे आणि सहकारी यांच्या गुड मॉर्निंग ग्रुप कडून 250 झाडांचे रोपण करून आषाढी एकादशी संपन्न.

Image
कामोठे नवी मुंबई - आज गुरुवार दि 29/06/2023 रोजी सकाळी 7.00 वाजता सेक्टर 25 कामोठे नवी मुंबई येथे आषाढी एकादशी या पवित्र दिवसाच्या निमित्ताने" पर्यावरण रक्षण ही आपली जबाबदारी" हा पर्यावरणपूरक उपक्रम,गुड मॉर्निंग ग्रुप, कामोठे फोरम, महिला आघाडी,व इतर संगठना या द्वारे संयुक्तपणे राबविण्यात आला. त्यात संग्रहित केलेल्या आंबा ,फणस, जांभूळ, इत्यादी प्रकारच्या बिया,घरातील कुंडीमध्ये उगवलेली झाडे अश्या एकूण 250 हून अधिक बीजरोपण, व झाडांचे रोपण करण्यात आले.  या"निसर्गसंवर्धन" उपक्रमात खालील सदस्यांनी पाऊस असतानाही अतिशय आनंदाने व हिरारीने भाग घेतला. सौ शुभांगी खरात मॅडम व त्यांची महिला टीम,श्री सुनिल कर्पे सर ,श्री सुरेशशेठ खरात,ऍड समाधान काशीद साहेब, व इतर सर्व आदरणीय सहकारी यांनी या पर्यावरण संवर्धन मोहिमेत सामील होऊन आषाढी एकादशीचा मुहूर्त संपन्न केला.

अतिवृष्टी व आपत्कालीन परिस्थितीत 1800222309 पालिकेच्या टोल फ्री क्रमांकास संपर्क साधा पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचे आवाहन

Image
नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिकेने पावसाळा कालावधीत नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याबाबत दक्षता घेतली असून नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर सर्व परिस्थिती नियंत्रणात राहील याकडे स्वत: लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे नागरिकांनी अडचणीच्या प्रसंगी घाबरून न जाता नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा अथवा महापालिका मुख्यालयातील मुख्य नियंत्रण कक्षाशी 022 – 27567060 / 7061 या दूरध्वनी क्रमांकाशी अथवा 1800222309 / 10 या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. 

नवी मुंबई महानगरपालिकेच्या मदतकार्य पथकांची तत्पर कार्यवाही

Image
नवी मुंबई-  यावर्षी मान्सूनने बरीच वाट बघायला लावल्यानंतर अखेरीस शनिवारी 24 जूनला सायं. 4 नंतर मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टीला सुरुवात झाली. महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या व्हॉट्सॲप समुहावर सर्व संबंधित घटकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले व कोणत्याही गरजेच्या ठिकाणी तात्काळ मदतकार्य पुरविण्याच्या सूचना दिल्या. त्यास अनुसरून मुख्यालयातील मध्यवर्ती तात्काळ कृती केंद्रामार्फत 5 अग्निशमन केंद्रे व 8 विभाग कार्यालयांतील आपत्कालीन नियंत्रण कक्ष याठिकाणची यंत्रणा दक्षतेने कार्यरत राहील याबाबत संबंधित नियत्रकांकडून सूचना निर्गमित करण्यात आल्या.        त्या अनुषंगाने 24 जून रोजी सकाळी 8.30 पासून 26 जून रोजी सकाळी 8.30 पर्यंत सरासरी 78.43 मि.मि. पर्जन्यवृष्टी होऊनही तसेच मोठ्या प्रमाणात 30 झाडे पडूनही नवी मुंबई महानगरपालिकेच्या मदतकार्य पथकांनी घटनास्थळी वर्दी मिळाल्यानंतर तत्परतेने पोहचत जनजीवन विस्कळीत होऊ दिले नाही.        24 व 25 जून रोजी सकाळी 8.30 ते 8.30 या 24 तासात बेलापूर विभागात सर्वाधिक म्हणज...

के सी आर यांची महाराष्ट्रात दमदार एन्ट्री 600 गाड्यांचा ताफा सोलापूर मध्ये दाखल.

Image
सोलापूर - तेलंगणा प्रांतातील प्रादेशिक पक्ष भारत राष्ट्र समिती या पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री चंद्रशेखर राव उर्फ के सी आर यांनी आज महाराष्ट्रामध्ये दमदार एन्ट्री केली. चंद्रशेखर राव आज दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे. त्यांचं अख्ख मंत्रिमंडळच महाराष्ट्रात येणार आहे. चंद्रशेखर राव राज्यात मोठं शक्तीप्रदर्शन करणार असल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.आज आणि उद्या 27 जून रोजी महाराष्ट्रात राहणार आहेत. तेलंगणातून ते थेट उमरग्याला येणार आहेत. त्यानंतर सोलापूरला रवाना होणार आहेत. आज ते पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची पूजा करणार आहेत. यावेळी चंद्रशेखर राव विठ्ठलावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याची शक्यता आहे.

wine shop sealed at seawoods action taken by state Exicse department

Image
Nerul Navi Mumbai - R k winse shop in vicinity of seawoods east formerly Nerul which was running illegally despite having breach of licence renewal. Big action by Navi Mumbai excise department RK wines shop at Nerul centaurian mall is totally evacuated entire stock seized and the shop is sealed by Navi Mumbai excise department as per the sources the wine shop was operating without the renewal of yearly licence.

Monsoon to hit all over Maharashtra soon

Image
 Mumbai Maharashtra - The arrival of Monsoon is likely to bring rain along with gale force winds over Madhya Maharashtra, Vidarbha, Marathwada, and Konkan. Orange alert has been given for Sindhudurg and Ratnagiri. However, the arrival of rain has made the farmers happy. Due to this rain, the crisis of double sowing has also been avoided. Pre-planting work has already started in Tal Konkan. Rain lashed Mumbai and Konkan from Friday night. The Meteorological Department has warned that monsoon will cover the state by June 29. Mumbai has been lashed by the first rains and the next 48 hours are crucial. Mumbai recorded 115.8 mm of rain on Saturday. Rains started in Mumbai from Saturday morning itself. Orange alert has been given to Mumbai. The Meteorological Department has predicted that rain will intensify in Mumbai in the next 48 hours. Therefore, a warning of heavy rain has been given.  #News #Navi mumbai #mumbai #Maharashatra weather alert 

संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी चे फलटण येथे आगमन

Image
फलटण सातारा - 21 जून रोजी ज्ञानेश्वर माऊली पालखीचे  मुक्काम पोस्ट फलटण येथे आगमन झाले. प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या लाखो माऊली भक्तांनी पालखी उत्सवाची शोभा वाढवली. तसेच स्थानिक माऊली भक्त यांनी देखील पालखी मधील ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. कोविड सदृश्य परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतर चा हा पहिला पालखी उत्सव सोहळा होता. फलटण नगर परिषद प्रशासन पोलीस प्रशासन व पालखी उत्सव समिती व सहकारी संस्था या सर्वांनी मिळून उत्तम नियोजन करून फलटण शहरात आलेल्या माऊली भक्तांची चांगल्या प्रकारे सोय करून दिली. एकंदरीत सकाळपासून आलेल्या माऊली भक्तांची संख्या पाहता सुमारे पाच लाख पेक्षा जास्त माऊली भक्त फलटणमध्ये दाखल झाले आहेत अशी प्रसिद्धी माध्यमांमध्ये चर्चा होती. आज रात्री फलटण शहरात मुक्काम केल्यानंतर उद्या भल्या पहाटे पुढच्या प्रवासासाठी सर्व माऊली भक्त व पालखी बरडच्या दिशेने रवाना होईल व पुढचा मुक्काम बरड या ठिकाणी होईल असे पालखी उत्सव समिती यांच्याकडून सांगण्यात आले. जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज त्याचप...