पर्यावरण प्रेमी सुनील करपे आणि सहकारी यांच्या गुड मॉर्निंग ग्रुप कडून 250 झाडांचे रोपण करून आषाढी एकादशी संपन्न.
कामोठे नवी मुंबई - आज गुरुवार दि 29/06/2023 रोजी सकाळी 7.00 वाजता सेक्टर 25 कामोठे नवी मुंबई येथे आषाढी एकादशी या पवित्र दिवसाच्या निमित्ताने" पर्यावरण रक्षण ही आपली जबाबदारी" हा पर्यावरणपूरक उपक्रम,गुड मॉर्निंग ग्रुप, कामोठे फोरम, महिला आघाडी,व इतर संगठना या द्वारे संयुक्तपणे राबविण्यात आला. त्यात संग्रहित केलेल्या आंबा ,फणस, जांभूळ, इत्यादी प्रकारच्या बिया,घरातील कुंडीमध्ये उगवलेली झाडे अश्या एकूण 250 हून अधिक बीजरोपण, व झाडांचे रोपण करण्यात आले.
या"निसर्गसंवर्धन" उपक्रमात खालील सदस्यांनी पाऊस असतानाही अतिशय आनंदाने व हिरारीने भाग घेतला. सौ शुभांगी खरात मॅडम व त्यांची महिला टीम,श्री सुनिल कर्पे सर ,श्री सुरेशशेठ खरात,ऍड समाधान काशीद साहेब, व इतर सर्व आदरणीय सहकारी यांनी या पर्यावरण संवर्धन मोहिमेत सामील होऊन आषाढी एकादशीचा मुहूर्त संपन्न केला.
Comments
Post a Comment