संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी चे फलटण येथे आगमन


फलटण सातारा - 21 जून रोजी ज्ञानेश्वर माऊली पालखीचे 
मुक्काम पोस्ट फलटण येथे आगमन झाले. प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या लाखो माऊली भक्तांनी पालखी उत्सवाची शोभा वाढवली. तसेच स्थानिक माऊली भक्त यांनी देखील पालखी मधील ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. कोविड सदृश्य परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतर चा हा पहिला पालखी उत्सव सोहळा होता. फलटण नगर परिषद प्रशासन पोलीस प्रशासन व पालखी उत्सव समिती व सहकारी संस्था या सर्वांनी मिळून उत्तम नियोजन करून फलटण शहरात आलेल्या माऊली भक्तांची चांगल्या प्रकारे सोय करून दिली. एकंदरीत सकाळपासून आलेल्या माऊली भक्तांची संख्या पाहता सुमारे पाच लाख पेक्षा जास्त माऊली भक्त फलटणमध्ये दाखल झाले आहेत अशी प्रसिद्धी माध्यमांमध्ये चर्चा होती. आज रात्री फलटण शहरात मुक्काम केल्यानंतर उद्या भल्या पहाटे पुढच्या प्रवासासाठी सर्व माऊली भक्त व पालखी बरडच्या दिशेने रवाना होईल व पुढचा मुक्काम बरड या ठिकाणी होईल असे पालखी उत्सव समिती यांच्याकडून सांगण्यात आले. जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज त्याचप्रमाणे संत नामदेव मुक्ताई निवृत्तीनाथ आणि सोपान देव त्याचप्रमाणे इतर अनेक स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यातर्फे आलेल्या पालखी व दिंडी यांचे आषाढी एकादशीच्या दिवशी 28 जून रोजी वारीचे शेवटचे ठिकाण पंढरपूर येथे आगमन होईल. सर्व वारकरी विठ्ठल रुक्माई यांच्या भेटीस जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन वारकरी आपल्या घरच्या प्रवासाच्या दिशेने निघतील.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय योग दिन वाशीमध्ये उत्साहात साजरा – वनमंत्री आणि प्रशासक यांचा संयुक्त योगा......कार्यक्रमाचे विशेष आकर्षण

सुनील पारकर यांचे आयुक्तांना निवेदन... कोपरखैरणे येथील चिकनेश्वर उद्यानाच्या प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी विनंती

Global music Star Holly natasja Live on News now.