डॉ कैलास शिंदे यांची यशस्वी कामगिरी ..शंभर दिवसाच्या कृती आराखड्यात नवी मुंबई महापालिकेचा तृतीय क्रमांक..


मुंबई - शासकीय कार्यालयांचे कामकाज अधिक गतिमान, प्रभावी आणि नागरिकांना उत्तरदायी बनविणे या उद्दिष्टपूर्तीसाठी विशिष्ट निकषांवर आधारित क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या मान्यताप्राप्त त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये सेवा वितरणाची वेळ, जनसंपर्क व प्रतिसाद, नविन उपक्रमांची अंमलबजावणी, डिजिटलायझेशनचे प्रमाण, नागरिकांच्या समाधान अशा बाबींचा समावेश करण्यात आला होता. त्यास अनुसरून 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहीमेंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कामाची दखल राज्यातील महानगरपालिकांमध्ये तृतीय क्रमांकाने घेण्यात आलेली आहे. नवी मुंबईचा हा राज्य स्तरावर झालेला गौरव आपले मानांकन अधिक उंचाविण्यासाठी प्रेरणा देणारा असून पारदर्शक, जबाबदार व कार्यक्षम प्रशासन राबविणाऱ्या कार्यपद्धतीचा गौरव आहे. लोकाभिमुख कार्यप्रणाली राबवत नागरिकांची महानगरपालिकेशी संबंधित कामे सुलभ रितीने व्हावीत याकरिता 68 लोकसेवा ऑनलाइन करण्यात आल्या असून त्या नागरिकांच्या सर्वाधिक वापर असणाऱ्या मोबाईल व व्हाॅट्सअप सारख्या माध्यमांवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यापुढील काळात लोकसेवांशिवाय महानगरपालिकेशी निगडित आणखी सेवा उपलब्धतेची कार्यवाही जलद करण्यात येत असून नागरिकांना अधिक तत्पर, गतीमान आणि समाधानकारक सेवा पुरविण्यासाठी उत्तम काम केले जाईल असा विश्वास व्यक्त करीत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी या गौरवाबद्दल समस्त नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

ऐश्वर्या राय यांच्या बरोबरीची मिस इंडिया स्पर्धक बॉलीवूड अभिनेत्री बरखा मदन यांनी स्वीकारला बुद्ध धम्म.

सतत यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रिल्स पाहिल्यामुळे मानवी स्मरणशक्तीवर वाईट परिणाम – वैज्ञानिकांचा इशारा

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..