समाजसेवक संतोष सुतार यांचा विरोध... नवी मुंबई महानगरपालिका विस्तार प्रकल्प 14 गावे समाविष्ट करण्यास प्रकार..
नवी मुंबई: नवी मुबंईत १४ नवी गावे घेण्यास आमच्या ग्रामस्थांसह नवी मुंबईकरांचाही प्रखर विरोधच: श्री संतोष सुतार नवी मुंबई १६ लाख नागरिक आणी ५००० हजार कोटी वार्षिक बजेट असणारी नवी मुंबई महानगर पालिका ही सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. आणी नवी मुंबई महानगर पालिका सध्या ज्या सर्वोच शिखरावर पोहचली आहे किंवा या महानगर पालिकेची गणना सर्वोच महानगर पालिकेत केली जाते ती आमच्या ग्रामस्थांच्या आणी नवी मुंबई महानगर पालिके तौल नागरिकांच्या खिशातून जात असलेल्या करातून पोहचली आहे. त्यामुळे आमच्या व नवी मुंबईकरांच्या खिशावरील करातून नावारूपाला आलेल्या या नवी मुंबई महानगरपालिके च्या सर्व शासकीय सुविधावर आमचा आणी नवी मुंबईकरांचा हक्क आहे आणी तो फक्त आम्हालाच मिळायला हवा. कल्याण आणी डोंबिवली महानगर पालिका हद्दीतील आणी काही जवळची गावे या आधी नवी मुंबई महानगर पालिका हद्दीत घेतली गेली होती मात्र सदरील गावातील नागरिकांनी त्यावेळी कर भरण्यास नकार तर दिलाच होता मात्र आम्हाला नवी मुंबई महानगर पालिकेत नको असा प्रखर विरोध देखील केला होता. एवढ्यावरच न थांबता
समाजसेवक संतोष सुतार यांनी संबंधित विषयाबद्दल महाराष्ट्र राज्य ट्रिपल इंजिन सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देखील दिले.
कल्याण डोंबिवली गावातील ग्रामस्थांनी नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीस विरोधही केला आणी या निवडणुकीवेळी एकही उमेदवार निवडणुकीत उतरवला नाही. याच गोंधळात सदरील गावात प्रचंड प्रमाणात अनधिकृत बांधकामे तर झालीच परंतु भंगारवाल्यानी सदरील गावांच्या शेजारची मोकळी जागा बळकावत त्या ठिकाणी आपला ताबा केला आहे. तरीही महाराष्ट्र शासनाचा असा अट्टाहास आणी प्रस्ताव आहे कि ही १४ गावे नवी मुंबई महानगर पालिकेत घ्या या शासन्याच्या प्रस्तावला आमचा विरोध आहे.
Comments
Post a Comment