पत्रकार दिन नवी मुंबई पालिका मुख्यालयात उत्साहाने साजरा

नवी मुंबई पालिका मुख्यालय - नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणा-या लोकोपयोगी कामांना जनतेपर्यंत पोहचविण्याचे व जनतेच्या विविध अडीअडचणी, सूचनांना महापालिका प्रशासनापर्यंत पोहचविण्याचे अत्यंत महत्वाचे काम पत्रकारांमार्फत होत असल्याबद्दल आभार व्यक्त करीत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी रूजविलेला पत्रकारितेचा वसा लिखित वर्तमानपत्रांपासून आजच्या डिजीटल माध्यमांच्या युगात समर्थपणे जपणा-या पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षामध्ये आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. कैलास शिंदे यांनी उपस्थित माध्यम प्रतिनिधींशी सुसंवाद साधला. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, मुख्य लेखा वित्त अधिकारी श्री. सत्यवान उबाळे, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, लेखा परिक्षक श्री. जितेंद्र इंगळे, अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे उपस्थित होते. नवी मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांनी सर्व पत्रकारांकडून नियमितपणे प्रसिध्दीसाठी मिळणा-या संपूर्ण सहकार्याबद्दल आभार मानले व बाळशास्त्री जांभेकर यांचा जीवनपट उलगडला.

महाराष्ट्रातील पहिले इतिहास संशोधक, लोकशिक्षणाचे आद्य प्रवर्तक, ज्ञानेश्वरीचे आद्य प्रकाशक, महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक, पहिले मराठी वृत्तपत्रकार व संपादक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सन 1832 मध्ये 6 जानेवारीला मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले. त्याचवेळी ब्रिटीश सत्ताधार्‍यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण’मध्ये मराठी भाषेतील उभ्या स्तंभाच्या शेजारी त्याच मजकूराचा एक स्तंभ इंग्रजी भाषेत लिहिला जात असे. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने ‘दर्पण’कारांनी पदरमोड करून व कुठलेही नफ्याचे तत्व न स्वीकारता अत्यंत निष्ठेने व निस्पृह वृत्तीने आपले वृत्तपत्र चालवले.

Comments

Popular posts from this blog

ऐश्वर्या राय यांच्या बरोबरीची मिस इंडिया स्पर्धक बॉलीवूड अभिनेत्री बरखा मदन यांनी स्वीकारला बुद्ध धम्म.

सतत यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रिल्स पाहिल्यामुळे मानवी स्मरणशक्तीवर वाईट परिणाम – वैज्ञानिकांचा इशारा

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..