समाजवादी पार्टी नवी मुंबई मिथुन कांबळे यांच्या तुझ्यामुळे अध्यक्षतेखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न
नवी मुंबई - महापुरुष आणि थोर स्त्रियांचे कार्य हे तळागळातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, तेव्हा समाजामध्ये प्रबोधन करण्याची खूप गरज आहे. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि माननीय लोकप्रिय आमदार अबू आझमी यांच्या विधान सभेतील वक्तव्याला सार्थ रूप देण्याच्या दिशेने मिथुन कांबळे यांचा हा नवी मुंबई येथील उपक्रम २०२५च्या नूतन वर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निम्मित राबवण्यात आला. असेच प्रबोधन वर्षभर राबवण्यात येतील.
महिला सक्षमीकरण कार्यक्रम
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती निमित्त एक विशेष कार्यक्रम नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला.
प्रथमच महिलांसाठी महिलेंनी केलेला असा हा कार्यक्रम.
समाजवादी पार्टीचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आणि एक दशकांहून अधिक काळ सामाजिक कार्य करणारे मिथुन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
सुमारे ५०० लोकांनी सहभाग घेतला, त्यापैकी प्रामुख्याने स्त्रिया आणि मुली होत्या.
नवी मुंबईच्या विविध भागांतील महिला आपापल्या भागामध्ये गटागटांनी एकत्र आल्या.
शालेय मुली तसेच युवती हि सोबत आल्या.
कार्यक्रमात प्रत्येक सहभागी महिलेला सावित्रीमाई फुले यांच्या प्रेरणादायी विचारांचा समावेश असलेला पोस्टर, तसेच त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तक देण्यात आले.
कार्यक्रमात सावित्रीमाई फुले यांचे जीवनकार्य आणि त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान, या बद्दल चर्चा करण्यात आली.
मिथुन कांबळे यांचे सामाजिक दृष्टिकोन आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे प्रयत्न याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच महिलांना त्यांच्या समस्या किंवा काही माहिती पाहिजे असल्यास समाजवादी पार्टीला संपर्क कसे करावे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
शेवट सरते चहा-नाष्ट्याचा आस्वाद घेत कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला.
प्रतिसाद
या कार्यक्रमामुळे सावित्रीमाई फुले यांची स्मृती जागवण्यास मदत झाली आणि त्यांच्या कार्यामुळेच आपण येथे आहोत, याची जाणीव झाली.पहिल्यांदाच स्वतः आयोजन करून कार्यक्रम घेतल्याने, महिलांमध्ये उत्साह व आत्मविश्वास निर्माण झाला. या कार्यक्रमामुळे महिलांना प्रेरणा मिळाली आणि त्यांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यास मदत झाली.
Comments
Post a Comment