नवी मुंबई पालिका अतिक्रमण विभागाचे कारवाई


नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत नेरुळ विभागात पाडकामाची कारवाई

नवी मुंबई - मा. उच्च न्यायालयाचे वेळोवेळी आदेशानुसार नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे अतिरिक्त आयुक्त (2) यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने नेरुळ विभागात पाडकामाची कारवाई करण्यात आली.

 नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नेरुळ विभागाअंतर्गत 1) श्री. श्रीमंत हजारे, एन.एल.-1 बी-16/15, से.10, नेरूळ, नवी मुंबई, 2) श्री. गंगाराम देशमुख, एन.एल.1 ए-6/4, से.10, नेरूळ, नवी मुंबई, यांचे सदर ठिकाणी प्रत्यक्ष पहाणी केली असता अंदाजे 3.50मी X 7.20मी मोजमापाचे G+4 आर. सी. सी. बांधकाम अनधिकृतरित्या करीत असल्याचे निदर्शनास आल्याने सदर अनधिकृत बांधकामधारकाला अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नेरुळ विभाग कार्यालयाकडून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 54 अन्वये दि.10/12/2024 रोजी नोटीस बजावण्यात आलेली होती. तथापि, नोटीसीची मुदत संपुष्टात येऊनही अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविण्यात आले नाही.

सदर कारवाई सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. जयंत जावडेकर व अतिक्रमण विभागातील कर्मचारी, 10 मजूर, 2 गॅस कटर, 6 ब्रेकर च्या सहाय्याने अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक समवेत सुरक्षारक्षक यांच्या मार्फत करण्यात आली आहे. यापुढे देखील अशाप्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.


Comments

Popular posts from this blog

ऐश्वर्या राय यांच्या बरोबरीची मिस इंडिया स्पर्धक बॉलीवूड अभिनेत्री बरखा मदन यांनी स्वीकारला बुद्ध धम्म.

सतत यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रिल्स पाहिल्यामुळे मानवी स्मरणशक्तीवर वाईट परिणाम – वैज्ञानिकांचा इशारा

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..