महाराष्ट्रातील सर्वात मोठी लँड डील नवी मुंबईत..5200 एकर जमीन 2200 करोड कवडीमोल भावात रिलायन्स ने केली खरेदी.
नवी मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं राज्यातील सगळी मोठी औद्योगिक जमीन खरेदी केलेली आहे. जमिनीचं क्षेत्रफळ ५,२८६ एकर इतकं आहे. अंबानी यांनी केवळ २२०० कोटी रुपयांमध्ये जमीन खरेदी केलेली आहे. या व्यहाराबद्दल संशय व्यक्त केला जात आहे डिसेंबर २०२४ मध्ये हा व्यवहार झाला. या जमिनीची मालकी आधी नवी मुंबई IIA प्रायव्हेड लिमिटेडकडे होती. नवी मुंबई सेझ नावानं हा परिसर ओळखला जायचा. रिलायन्सनं NMIIAमध्ये ७४ टक्के भागिदारी खरेदी केली आहे. या व्यवहारात आनंद जैन यांची कंपनी जय कॉर्प लिमिटेडचाही सहभाग आहे. जय कॉर्पची सहायक कंपनी असलेल्या अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडजवळ NMIIAची मालक कंपनी द्रोणागिरी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचा ३२ टक्के हिस्सा आहे.
व्यवहारानंतर अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड आपलं भांडवल कमी करण्याच्या तयारीत आहे. या जमिनीच्या खऱ्या किमतीबद्दल आता प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. कारण या जमिनीजवळ मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि नवी मुंबई विमानतळ यांच्यासारखे मोठे पायाभूत प्रकल्प आहेत. त्यामुळे या जमिनीची किंमत बरीच जास्त असायला हवी होती.
Comments
Post a Comment