3 जानेवारी रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

 नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत दरवर्षी 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिन नानाविध उपक्रम राबवून उत्साहाने साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महिला व मुलींकरिता रांगोळी, मेहेंदी, निबंध, पाककला, सॅलेड सजावट, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, नृत्य व गायन स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महिला व बालकल्याण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणा-या सामाजिक संस्था / महिला मंडळे यांना क्रांतीज्योजी सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असते.

     या अनुषंगाने रांगोळी स्पर्धा, योगासने, नृत्य व गायन घेण्यात आल्या असून पाककला, सॅलेड सजावट व टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे या स्पर्धा दि. 03 जानेवारी 2025 रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी या ठिकाणी घेण्यात येणार आहेत.

    3 जानेवारीच्या कार्यक्रमात विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ, सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान समारंभ तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम हे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहेत. तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त महिला / महिला मंडळे / महिला बचत गट यांनी दि. 03 जानेवारी 2025 रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी या ठिकाणी सकाळी 9.30 वाजल्यापासून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे, असे जाहीर आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.


Comments

Popular posts from this blog

ऐश्वर्या राय यांच्या बरोबरीची मिस इंडिया स्पर्धक बॉलीवूड अभिनेत्री बरखा मदन यांनी स्वीकारला बुद्ध धम्म.

सतत यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रिल्स पाहिल्यामुळे मानवी स्मरणशक्तीवर वाईट परिणाम – वैज्ञानिकांचा इशारा

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..