टॉरेसने मोसोनाईट दगड विकून घातला गंडा.. युक्रेनियन महिलेने केला 25 ते 30 कोटी चा घोटाळा.. लकी ड्रॉ मध्ये ग्राहकांना गाडीचे आमिष..

सानपाडा नवी मुंबई: टॉरेस ज्वेलरी नावाने सुरू करण्यात आलेल्या एका भव्य घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. युक्रेनियन घोटाळेबाजानी भारतीय नागरिकांना जवळपास 25 ते 30 कोटी कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. या घोटाळ्यात तो सामान्य दगड आणि खडकांना महागड्या रत्नांचा दर्जा देत विक्री करीत होता.

बॉलीवूड सेलिब्रटी यांच्या हस्ते स्टोअरचे उद्घाटन 

अत्यंत थाटामाटात बॉलिवूड सेलिब्रिटींना आणून टो रसच्या दादर येथील स्टोअरचे दिमाखात ओपनिंग केले होते. तसेच या ओपनिंगला मोठमोठ्या वृत्तपत्रात जाहिराती देऊन नागरिकांना आकर्षित करण्यासाठी फ्रंट पेजला जाहिराती दिल्या होत्या.
200 रुपये किंमतीचे दगड सात हजारांना विकले

"टॉरेस ज्वेलरी"च्या नावाखाली भव्य दालनं उघडून सामान्य खडक आणि दगडांना महागड्या रत्नांचा दर्जा दिला. हे दगड ग्राहकांना प्रति तुकडा ७,००० रुपयांना विकण्यात आले. आकर्षक जाहिराती आणि भव्य उद्घाटने करून मुंबई तसेच उपनगरी भागातील नागरिकांना या फसवणुकीत ओढण्यात आले.

महिलांना दगड विकून आठवड्याला दहा टक्के रिटर्नचे आमिष

महिलांना विशेष करून ज्वेलरीचे प्रचंड आवड असते याच गोष्टीला टारगेट करून महिलांना साधे दगड विकून दर आठवड्याला दहा टक्के रिटर्न देण्याचे अमिष महिलांना दाखवले गेले त्यामुळे अनेक महिलांनी त्यांच्या पतींना मागे लागून या स्टोअर मध्ये ज्वेलरी घेण्यासाठी भाग पाडले. यात काही उच्चभ्रू वर्गातील महिलांनी लाखो रुपयांचे इन्व्हेस्टमेंट केले असल्याचेही उघड झाले आहे. 

मुंबई व उपनगरांमध्ये भव्य उद्घाटन
घोटाळ्याचा प्रमुख आरोपीने मुंबई आणि आसपासच्या भागात भव्य उद्घाटन समारंभ आयोजित केले होते. आकर्षक ऑफर्स आणि बनावट शुद्धतेच्या प्रमाणपत्रांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना आकर्षित करण्यात आले.

दर आठवड्याला लकी ड्रॉ मध्ये गाडी गिफ्ट 
टोरस ज्वेलरी ब्रँडच्या मुंबई उपनगरातील सर्व स्टोअर्स मधून एक लकी विनर निवडून त्याला दर रविवारी एक गाडी गिफ्ट केली जात होती या गाडीच्या अमिषा पोटी हे अनेक मुंबईकरांनी लाखो रुपयाचे दगड घेऊन इन्व्हेस्टमेंट केली होती.

पोलिस तपास सुरू सानपाडा येथे गुन्हा दाखल
भारतीय ग्राहकांनी फसवणूक झाल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सध्या आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या आकर्षक ऑफर्सपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. एकंदरीत 1500 पेक्षा जास्त नागरिकांनी इन्व्हेस्टमेंट च्या नावाखाली फसवणूक केल्याचे तक्रार मुंबई व इतर परिसरातील पोलीस स्टेशनमध्ये केली आहे.

#torresscam #scam #Ukrainian #NewsUpdate

Comments

Popular posts from this blog

ऐश्वर्या राय यांच्या बरोबरीची मिस इंडिया स्पर्धक बॉलीवूड अभिनेत्री बरखा मदन यांनी स्वीकारला बुद्ध धम्म.

सतत यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रिल्स पाहिल्यामुळे मानवी स्मरणशक्तीवर वाईट परिणाम – वैज्ञानिकांचा इशारा

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..