26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन आणि या दिवशी भारतीय संविधानाने सर्व भारतीयांना दिलेले मूलभूत हक्क आणि अधिकार
26 जानेवारी अर्थात भारतीय प्रजासत्ताक दिना दिवशी लिहिलेला विशेष संपादकीय लेख (लेखक संपादक - प्रतिक यादव) = 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांस दिलेले मूलभूत हक्क आणि अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकांना माहित असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतात प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी का साजरा केला जातो ? - प्रजासत्ताक अर्थातच प्रजेचे व जनतेचे राष्ट्र याच अनुषंगाने भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश इंग्रज सरकार यांच्या पार तंत्रातून मुक्त होऊन स्वतंत्र झाला कालांतराने भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली त्याच्या अनुषंगाने 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान स्वीकारले गेले लागू झाले व भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक देश म्हणून स्थापित झाला या कारणामुळे 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व काय आहे? - 26 जानेवारी 1950 पासून भारतामध्ये संविधान लागू झाले व भारताच...