आकाशदीप मागासवर्गीय संस्था आणि इतर संस्थांचा समूह यांनी महापरिनिर्वाण दिनी भिम अनुयायांसाठी केले अन्न व पाण्याचे मोफत वाटप
मुंबई, शुक्रवार, 6 डिसेंबर 2024: महापरिनिर्वाण दिनानिमित्त, दादर येथील चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क मैदान येथे भिम अनुयायांसाठी विशेष सेवा देण्यात आली. या उपक्रमाचे आयोजन उल्हासनगर येथील राजहंस कलादिप शैक्षणिक, सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा आशा प्रदीप जाधव, नवी मुंबई येथील आकाशदिप मागासवर्गीय शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष प्रदीप शिवराम जाधव, तसेच ठाणे येथील हर्षकल्याण शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष माया कल्याण जाधव यांनी केले होते.
कार्यक्रमादरम्यान अडीच हजार भिम अनुयायांना मोफत बिस्किटे, चिवडा आणि बिस्लेरी पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले. लाखो लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येथे जमले होते. या मोठ्या गर्दीत या सेवेमुळे अनुयायांना मोठा दिलासा मिळाला.
सामाजिक उपक्रमाच्या यशस्वितेसाठी स्थानिक स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला. उपस्थित अनुयायांनी आयोजकांची प्रशंसा केली आणि त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल आभार मानले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने अनुयायांच्या मनामध्ये एक वेगळा ठसा उमटवला आहे.
"ही सेवा सामाजिक सलोखा वाढवण्याचा संदेश देते," असे मत अनेकांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment