एकनाथ शिंदे यांनी घेतली उप मुख्यमंत्री पदाची शपथ
मुंबई - महायुती सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळी पत्रकार परिषद घेतली. तत्पूर्वी तीनही नेत्यांनी शपथविधीनंतर पहिल्या तासातच मंत्रिमंडळाची बैठक घेऊन हे सरकार गतिमान असल्याचे दाखवून दिले. एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शपथविधीला उपस्थिती लावल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच देशभरातील इतर मान्यवर शपथविधीला आले, त्याबद्दलही आभार व्यक्त केले. तसेच मी पूर्वी सीएम अर्थात ‘कॉमन मॅन’ होतो, आता मी डीसीएम झालो आहे. अर्थात आता मी ‘डेडीकेटेड टू कॉमन मॅन’ झालो असल्याची मिश्किल प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
Comments
Post a Comment