आरपीआय ए नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हॉस्पिटल पीडित नागरिकांना मिळाला न्याय ..

नवी मुंबई - आर पी आय ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या अध्यक्षतेखाली आर पी आय ए जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तक्रार प्राप्त झाल्यानंतर नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्र गायकवाड, नवी मुंबई जिल्हा प्रभारी प्रकाश पवार गोळवसकर साहेब व पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष सुनील भाऊ ढसाळ यांच्या नेतृत्वाखाली मंगल प्रभू रुग्णालयावर धडक दिली. हॉस्पिटलमध्ये प्रशासनाला खरमरीत जाब विचारून रुग्णाला व त्याच्या आई-वडिलांना न्याय मिळवून दिला व हॉस्पिटल प्रशासनाला दीड लाख रुपये माफ करून रुग्णाला डिस्चार्ज देण्यास भाग पाडले. सदर प्रसंगी रुग्णाच्या नातेवाईकाने पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. सदर प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष गौतम चव्हाण, रोहित एरंडे तसेच माननीय दीपक भाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) नवी मुंबई जिल्ह्याचे जिल्हा सरचिटणीस निवास साबळे, संपर्कप्रमुख प्रतीक यादव, संघटन सचिव सुदत्त खरात, ऐरोली विधानसभा अध्यक्ष अमोल जावळे, बेलापूर विधानसभा उपाध्यक्ष माणिक कांबळे तसेच महावीर गायकवाड प्रतीक डोलारे देखील उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

ऐश्वर्या राय यांच्या बरोबरीची मिस इंडिया स्पर्धक बॉलीवूड अभिनेत्री बरखा मदन यांनी स्वीकारला बुद्ध धम्म.

सतत यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रिल्स पाहिल्यामुळे मानवी स्मरणशक्तीवर वाईट परिणाम – वैज्ञानिकांचा इशारा

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..