जन्मदिनाच्या दिवशी देहदानाचा संकल्प - युवा नेतृत्व पूजा प्रकाश एन



पुणे-  जन्मदिन विशेष बातमी  "मरावे परी कीर्ती रुपी उरावे'’ या उक्तीचा प्रत्यय देहदान ही संकल्पना देते. मात्र समाजात अवयवदान, देहदानाविषयी कमालीचा संभ्रम असून देहदान करणाऱ्यांची टक्केवारी अत्यल्प आहे. लोकांमध्ये याबाबत जनजागृती होण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे. सामाजिक संस्था प्रयत्नशील असल्या तरी ‘देहदान’ संदर्भात केवळ अर्ज भरत औपचारिकता पार पाडली जात असल्याचे चित्र आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना एखादी शस्त्रक्रिया करण्यासाठी,अपघाताशी संबंधित जलद उपचारासंबंधित तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करण्यासाठी मानवी मृतदेह गरजेचा आहे. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अशा मृतदेहांची कमतरता असून त्यामुळे वैद्यकीय विशेषत शस्त्रक्रिया विषयक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

देहदान म्हणून येणाऱ्या मृतदेहांचा वापर हा विद्यार्थ्यांना शरीरशास्त्र अभ्यास, शस्त्रक्रियेसाठी करण्यात येतो. देहदानाचा वैद्यकीय शिक्षण-संशोधनासाठी उपयोग होत असला तरी अभ्यास आणि संशोधनासाठी मृतदेहांचा तूटवडा जाणवत असल्याचे सत्य आहे, या विषयी माहीती घेतल्यावर सामाजिक, राजकीय, सुधारणा व्हाव्यात या करीता कार्यरत असलेल्या "प्रयाश सहेली मंच" च्या संस्थापक अध्यक्षा *पुजा प्रकाश एन* यांनी आपल्या जन्म दिवस प्रित्यर्थ १७/०७/२०२३ रोजी देहदानाचा संकल्प केला.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय योग दिन वाशीमध्ये उत्साहात साजरा – वनमंत्री आणि प्रशासक यांचा संयुक्त योगा......कार्यक्रमाचे विशेष आकर्षण

सुनील पारकर यांचे आयुक्तांना निवेदन... कोपरखैरणे येथील चिकनेश्वर उद्यानाच्या प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी विनंती

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..