विचारधारेचा अस्त - काय सांगतात विचारवंत पुजा प्रकाश वाचा लेख

 

पुणे -  सेना भाजप युती, पुढे महाविकास आघाडी ते आत्ताची निनावी आघाडी. आज नीलमताई गोरे यांनी पक्ष बदलला . राष्ट्रवादीत कुठे कोण ते ठरायचंय. पंकजाताई मुंडें भाजप सोडण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा एक गट फुटीच्या पावित्र्यात आहे . सर्वपक्षीय सर्वसामान्य मतदार आता बोअर झाले आहेत. राज्यशास्त्र विषयात  End of Ideology ( विचारधारांचा अंत ) नावाची एक संकल्पना पूर्वीपासून चर्चेत आहे.  डॅनियल बेल नावाच्या विचारवंताने १९६० च्या सुमारास याच नावाचे पुस्तक लिहिले होते. त्याच्या म्हणण्यानुसार तत्कालीन राजकीय विचार कालबाह्य झाला होता. कम्युनिस्ट , सोशॅलिस्ट , नेशनालिस्ट वगैरे राजकीय विचारधारा बाद झाल्या आहेत …. आणि सर्वसामान्य लोकांच्या जीवनात यातल्या कोणत्याच राजकीय विचारधारा कोणताच फरक पाडू शकत नाहीत . तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रगतीचा वेग यापुढे जीवनमान ठरवेल. 

डॅनियल बेल ने त्याच पुस्तकात अजून एक महत्वाचा मुद्दा मांडला आहे. तो मुद्दा राजकीय क्रांती बद्दल आहे . युरोपात गेली अनेक वर्ष राजकीय विचारांची युद्धे झाली . क्म्युनिस्ट , फेसिस्ट इत्यादी राजकीय कारणासाठी रक्तपात झाले. यापुढे अशी युद्धे किंवा देशांतर्गत यादव्या होणार नाहीत. याचे महत्वाचे कारण म्हणजे राजकीय गट एकमेकांशी सुसंवाद स्थापन करुन राजकीय सत्ता वाटून घेतील . वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीने लोकांचे जीवनमान जसे उंचावत जाते तसे दंगलखोर फूट सॉल्जर्स बाजारात उपलब्ध राहत नाहीत. त्यांची आवश्यकता उरत नाही. 

राजकीय गट आपापसात तडजोडी करुन सत्ता वाटून घेतात आणि राजकारणात - वाटाघाटी डील करणे हेच महत्वाचे बनते. राजकीय विचार अर्थहीन बनतात कारण ज्या काळात ते राजकीय विचार तयार झाले ती परिस्थिती कालबाह्य बनते.अर्थात भारताला ही थेअरी जशीच्या तशी लागू पडत नाही. पण आपण पुढील काही अंदाज बांधू शकतो.

राम मंदिर , ३७० , समान नागरी कायदा इत्यादी ज्वलंत विषय निकालात काढले तर “ राजकीय हिंदुत्व “ कितीसे आकर्षक राहिल ? काँग्रेस काळात दमन झाल्याने हिंदुत्व फोफावले , मोदी काळ जर १५ वर्ष टिकला तर हिंदुत्वाच्या त्यापुढच्या मागण्या काय असतील ? एकीकडे भाजप पसमंदा ( मागासवर्गीय ) मुस्लिमाना स्वतःकडे खेचतो आहे . दुसरीकडे दोन्ही तिन्ही सेना हिंदुत्व वादी असल्या तरी भाजपच्या दावणीला कायमच्या बांधल्या जाणार नाहीत .

सेक्युलर म्हणून जो काही राजकीय विचार आहे तो पहिल्यापासून खुळचट भाबडेपणा जातीनिहाय सेल, विशिष्ट वर्गाचं बोलघेवडं लांगूलचालनाचा फार्स यावर उभा आहे . पुढच सोडा आजतरी सेक्युलर या राजकीय विचाराला काय अर्थ उरला आहे ?  

क्म्युनिस्ट, पुरोगामी वगैरे विषययावर कार्यरत असणाऱ्यांनी सामान्यांच्या जिवनात काय बदल घडवला आहे . भविष्यात त्याला काय अर्थ राहणार आहे. पुरोगामी, प्रतिगामी, सेक्युलर नाॅन सेक्युलर, कम्युनिस्ट, अशा भर गच्च शब्द सामर्थ्याने सामान्य जनांच्या जीवनात काडीमात्र ही फरक पडला नाही, उलट दारिद्र्य, बेरोजगारी, कुपोषण, शेतकरी आत्महत्या यांच प्रमाण दिंसेदिंवस वाढत चाललेलं आहे, व्हाल्टेअरचं लोकशाही तत्व व बेल चा विचार इथे लागु पडतो का यावर मंथन होणे गरजेचं आहे. डॅनियल बेल चा विचार जसाच्या तसा भारताला लागू पडणार नाही कारण त्याला युरोपियन इतिहासाचे संदर्भ आहेत. पण येत्या दहा वर्षात राजकीय विचारांचा संघर्ष कितीसा शिल्लक उरेल हा एक प्रश्नच आहे . बहुतेक सर्व मुद्द्यावर बहुतेक सर्व गटांचे एकमत होण्याच्या दृष्टीने ही पाऊले पडत आहेत काय राजकारण्याना स्वार्थी भ्रष्ट मानून या घडामोडीकडे एका चष्म्यातून पाहता येते. दुसऱ्या बाजूने पाहिले तर सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात खरा बदल (विज्ञान तंत्रज्ञान )  इंटरनेट ने आणला - कोणत्या राजकीय पक्षाने नव्हे आणि इंटरनेट हा मानवीय मेंदूची निर्मिर्ती आहे,  शोध आहे , आणि अशा प्रकारचे शोधाचा अविष्कार करण्यासाठी मेंदूला रचनात्मक दिशेने कार्य प्रवण करावं लागतं थोडक्यात काय तर पुरोगामी, प्रतिगामी च्या फुशारकी च्या तत्वांना तिलांजली देऊन रचनागामी बनावं लागतं, रचनागामी झालो तरचं उद्याच्या भारताच्या पिढयांच भविष्य आपण उज्वल करु शकतो. रचनागामी बनुया राष्ट्र निर्माणा करीता एकत्र येउया भविष्यातील पिढीसाठी सुख समृद्धिचं युग निर्माण करुया.

( परिचय - पुजा प्रकाश एन.
 B.A LLB, M. A. Political Science, Geography, Sociology.  संस्थापक: प्रयाश  फाउंडेशन
लेखिका पूजा प्रकाश या पुणे प्रांतातील समाजसेवक आणि विचारवंत आहेत प्रयाश फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून त्या समाजसेवा करत असतात.)
 

         

Comments

Popular posts from this blog

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..

डॉ. संजय तारळेकर: नवी मुंबईतील प्रसिद्ध समाजसेवी हृदय विकार तज्ञ

आरपीआय आठवले गट नवी मुंबई कार्याध्यक्ष धरमशी रावरिया आणि जिल्हाध्यक्ष महेश खरे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेणार