Posts

लेखक प्राध्यापक डॉ. केशव साठ्ये यांच्या "'माध्यमांतील दिवस" या पुस्तकाचे माजी न्यायाधीश जी डी पारेख यांनी केल परीक्षण..

Image
पुणे (लेखक परीक्षक माजी न्यायाधीश जी डी पारेख) : माध्यम संक्रमणाचे समृद्ध आणि सूरेल समालोचन: अमोल पालेकरांचा दृश्यकला , रंगभूमी व चित्रपटांतील विलोभनीय आणि समृद्ध प्रवास मनात रेंगाळत असतानाच असाच मन गुंतूंन ठेवणारा दर्जेदार ऐवज इतक्या लवकर हातात पडेल असे वाटले नव्हते. परंतु अचानक माझे ‘ समाज- माध्यमातील ’ मित्र डॉ. केशव साठये यांचे ' माध्यमांतले दिवस ' अनुभवण्यासाठी येण्याचे आमंत्रण आले. कला, संगीत, लेखक , कवी, चित्रकार , पत्रकार , अभ्यासक , शास्त्रज्ञ अशा विविध क्षेत्रांतील प्रभावशाली व्यक्तींचे संक्षिप्त चित्रण करणारे ' भिनलेली माणसं ' हे डॉ . केशव साठये यांचे पुस्तक अलीकडेच तीनेक वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. ते पुस्तक त्यांच्या कडून प्रथम घेणारी व्यक्ती मीच होतो आणि योगा योगाने 'माध्यमांतले दिवस ' या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचा पहिला लाभार्थीही मीच आहे. माध्यमांतील दिवस हे पुस्तक लेखकाने चार दशकांच्या प्रवासात घेतलेल्या वैविध्यपूर्ण अनुभवांचा कॅलिडोस्कोपच आहे. पत्रकारितेचे धडे घेण्यासाठी रानडे इन्स्टिटयूट मध्ये दाखल झाल्यापासून जाहिरात...

समाजसेवक संतोष सुतार यांचा विरोध... नवी मुंबई महानगरपालिका विस्तार प्रकल्प 14 गावे समाविष्ट करण्यास प्रकार..

  नवी मुंबई: नवी मुबंईत १४ नवी गावे घेण्यास आमच्या ग्रामस्थांसह नवी मुंबईकरांचाही प्रखर विरोधच: श्री संतोष सुतार नवी मुंबई १६ लाख नागरिक आणी ५००० हजार कोटी वार्षिक बजेट असणारी नवी मुंबई महानगर पालिका ही सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. आणी नवी मुंबई महानगर पालिका सध्या ज्या सर्वोच शिखरावर पोहचली आहे किंवा या महानगर पालिकेची गणना सर्वोच महानगर पालिकेत केली जाते ती आमच्या ग्रामस्थांच्या आणी नवी मुंबई महानगर पालिके तौल नागरिकांच्या खिशातून जात असलेल्या करातून पोहचली आहे. त्यामुळे आमच्या व नवी मुंबईकरांच्या खिशावरील करातून नावारूपाला आलेल्या या नवी मुंबई महानगरपालिके च्या सर्व शासकीय सुविधावर आमचा आणी नवी मुंबईकरांचा हक्क आहे आणी तो फक्त आम्हालाच मिळायला हवा. कल्याण आणी डोंबिवली महानगर पालिका हद्दीतील आणी काही जवळची गावे या आधी नवी मुंबई महानगर पालिका हद्दीत घेतली गेली होती मात्र सदरील गावातील नागरिकांनी त्यावेळी कर भरण्यास नकार तर दिलाच होता मात्र आम्हाला नवी मुंबई महानगर पालिकेत नको असा प्रखर विरोध देखील केला होता. एवढ्यावरच न थांबता समाजसेवक संतोष सुतार यांनी संबंधित विषयाबद्दल महाराष्ट...