Posts

महिला आरक्षण विधेयकाची तत्काल अमंलबजावणी करुन, संसदीय लोकशाहीत भारताने जगात आदर्श निर्माण करावा - ॲड . पुजा प्रकाश एन.

Image
पुणे - यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:। ज्या देशामध्ये अनादी काला पासून स्त्री महिमा गायल्या जातो, स्त्री चे मोठेपण स्विकार करण्यासाठी स्त्री महात्म्य वर्णिलं जातं, मातृसत्तात्मक संस्कृति चे ऐतिहासिक दाखले ज्या भूमि मध्ये अभ्यास क्रमात समाविष्ट असतात, मातृसत्तात्मक पद्धती चे मोठेपण स्विकार करुण स्त्री ला विद्येची देवता, घराची करुणा, व जन निर्मीतीचा अविष्कार समजलं जातं, त्याच भूमीत मध्ययुगीन कालात स्त्री वर्गावर अन्याय अत्याचार वाढतात,तीचं महात्म्य नाकारुण स्त्री शक्ति ला, मातृशक्ति ला दास्यत्वात ढकललं जात या दास्यत्वात ढकलून कर्मीक बंधनात अडकवून स्वातंत्र्य हिरासत गुलाम म्हणून हिणवल्या गेलं, या अशा मानवीय समूहास कंलकीत ठरणाऱ्या संस्कृति व साहित्य निर्माण कर्त्याचा निषेध करायला हवा.या मध्ययुगीन कालात भारतीय संस्कृति च्या स्त्री विषयक दृष्टिकोन अन्याय जोर जुल्म असा जबरदस्त असतांना सुद्धा बरयाच स्त्रीयांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या कर्तृत्वाचा अमीट ठसा ऐतिहासिक दस्ताऐवजा मध्ये सुवर्णांकींत अक्षरांनी कोरुण...

बेलापूर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानक या दरम्यान होणाऱ्या मेगाब्लॉकसाठी परिवहन उपक्रमाकडून विशेष जादा बसेसची व्यवस्था…

नवी मुंबई - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने पनवेल रेल्वे स्थानक येथे मुख्य पायाभूत सुविधा संबंधित कामकाजाकरीता बेलापूर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानक या दरम्यान दि.30/09/2023 रोजी रात्रौ 23.00 पासून ते दिनांक 02/10/2023 रोजी दुपारी 13.00 वाजेपर्यंत 38 तासांचा मेगाब्लॉक घेतलेला आहे. त्यामुळे बेलापूर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानक दरम्यान लोकल रेल्वेची सेवा बंद राहणार आहे. त्याअनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून वरील मेगाब्लॉक कालावधीत प्रवाशांच्या सोयीकरीता 28 विशेष बसेसने 232 फेऱ्यांद्वारे बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त बेलापूर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानक दरम्यान दैनंदिन धावणाऱ्या विविध मार्गाच्या 46 बसेसच्या 196 फेऱ्या देखिल प्रवाशांना उपलब्ध होतील. उक्त मेगाब्लॉक कालावधीत खारघर व तळोजा विभागातून विविध मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांची गैरसोय होवू नये म्हणून खारघर रेल्वे स्थानकाऐवजी बेलापूर रेल्वे स्थानकापर्यंत बसेस उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. तसेच खारघर रेल्वे स्थानक येथून सुटणारे मार्ग हे बेलापूर रेल्वे स्था...

नवी मुंबई महानगरपालिकेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या हस्ते सन्मान

Image
नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतून विहित वयोमानानुसार सप्टेंबर महिन्यात सेवानिवृत्त होणारे मुख्याध्यापक श्री. सूर्यभान कलवार तसेच वरिष्ठ लिपिक- कर निरीक्षक श्री गणेश भालेराव या दोन कर्मचाऱ्यांचा नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते शाल, सन्मानचिन्ह  व ग्रंथभेट देऊन सन्मान करण्यात आला.           याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ तसेच शहर अभियंता श्री. संजय देसाई, प्रशासन विभागाचे उपायुक्त श्री. शरद पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे, भांडार विभागाच्या उपायुक्त श्रीम. मंगला माळवे आणि इतर अधिकारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी कर्तव्यभावनेने केलेल्या सेवाकार्याचा गौरव करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

355 सफाईमित्रांची कुटुंबियांसह सफाईमित्र सुरक्षा शिबिरात आरोग्य तपासणी

Image
    नवी मुंबई- ‘स्वच्छता ही सेवा’ या राष्ट्रव्यापी उपक्रमांतर्गत लोकसहभागातून स्वच्छताविषयक विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. यामध्ये दैनंदिन साफसफाई कामात समर्पित भावनेने दररोज योगदान देणा-या सफाईमित्रांकरिता नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेद्रात सफाईमित्र सुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 355 सफाईमित्र व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यात आली व विविध चाचण्यांच्या अहवालानुसार त्यांस आवश्यक वैद्यकिय मार्गदर्शन करण्यात आले.       सर्व ऋतुंमध्ये सफाईमित्र दररोज सकाळपासून शहर स्वच्छतेचे काम मनोभावे करीत असतात. बरेचदा त्यांच्याकडून स्वत:च्या आरोग्याविषयी आवश्यक ती काळजी घेतली जात नाही. अशावेळी त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी केली जावी यासाठी पुढाकार घेत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार महापालिका मुख्यालयात घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने सफाईमित्र व त्यांच्या कुटुंबियांकरिता सफाईमित्र सुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.       या शिबिराचे आयोजन हार्ट फा...

1 ऑक्टोबरला ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमात हजारो नवी मुंबईकर रस्त्यावर उतरून करणार एक साथ, एक तास श्रमदान

Image
नवी मुंबई- ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत नुकतेच 17 सप्टेंबरला सकाळी ठीक 8 वा. शहराच्या 8 विभागांत 1 लाख 14 हजार इतक्या मोठ्या संख्येने नवी मुंबईकर नागरिकांनी एकत्र येत स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली, ज्याची विक्रमी नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये घेण्यात आली. अशाच प्रकारचा आणखी एक विशेष उपक्रम मा. पंतप्रधान महोदय यांच्या देशव्यापी आवाहनानुसार रविवार, दि. 1 ऑक्टोबर 2023 रोजी, सकाळी ठीक 10 वाजता एकाच दिवशी एकाच वेळी नागरिकांनी आपापल्या विभागात एकत्र येऊन स्वच्छतेसाठी श्रमदान करून यशस्वी करावयाचा आहे. याबाबत मा. मुख्यमंत्री महोदयांनीही हा उपक्रम म्हणजे लोकचळवळ व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या अनुषंगाने स्वच्छतेमध्ये नेहमीच अग्रेसर असणा-या नवी मुंबई महानगरपालिकेने हा ‘स्वच्छांजली’ उपक्रम भव्यतम स्वरूपात आयोजनाकरिता तसेच मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार याव्दारे स्वच्छतेची लोकचळवळ उभी रहावी या हेतूने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, उद्याने, स्टेशन, डेपो, मार्केट, आरोग्य केंद्रे, नाला परिसर, पडीक जागा अशा तब्बल 267 ठिकाणी विशेष...

इंडियन स्वच्छता लीग 2' मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे '3 बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’

Image
    नवी मुंबई -  ‘इंडियन स्वच्छता लीग 2’ मध्ये सहभागी होताना नवीन उच्चांक प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून सहभागी झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने लीग अंतर्गत आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छताविषयक अभिनव उपक्रमांचे आयोजन केले होते. या उपक्रमांची विशेष दखल राष्ट्रीय पातळीवर ‘स्वच्छ भारत मिशन’च्या वतीने घेण्यात आलीच, शिवाय ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ या राष्ट्रीय पातळीवर आगळ्यावेगळ्या विक्रमांची नोंद घेणा-या संस्थेमार्फतही यांची विशेष दखल घेत ‘इंडियन स्वच्छता लीग’मधील नवी मुंबई महानगरपालिकेच्या 3 वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांना 3 ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ने गौरविण्यात आलेले आहे. राष्ट्रीय विक्रमांची नोंद असलेली ही तिन्ही ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ची विक्रमी प्रमाणपत्रे बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्सचे भारतातील परीक्षक आंतरराष्ट्रीय क्रीडापटू श्री.बी.बी. नायक यांनी महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांना प्रदान केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम.सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाब...

भारतीय न्याय प्रणालीचा संक्षिप्त आढावा - Adv. Pooja Prakash n

Image
नवी मुंबई - ज्या महापुरुषांच्या विचारधारा, व कर्तव्याने मला रचनात्मक कार्य करण्याची समज प्राप्त झाली, दिशा मिळाली त्यापैकी एक महापुरुष म्हणजे परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी इ. स. १९२३ ला विधी पदवी प्राप्त केली २०२३ ला त्या सुवर्णक्षणाला एक शतक (१०० वर्ष) पूर्ण झाले,आणि या शतकपूर्ती वर्षीचं मला सुद्धा विधी पदवी व सनद प्राप्त झाली, त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन,बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन माझ्या ही हातुन बाबासाहेबां सारखचं देदिप्यमान कार्य घडो, या जाज्वल्य इच्छा सह कार्यरत होवो करीता.. विधी पदवी ग्रहणानंतर सनद प्राप्ती झाली, त्या प्रित्यर्थ #बाबासाहेब आपल्या अतुलनीय कार्यास मानाचा मुजरा..         आपण भारतीय असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. तितकाच आपल्याला आपल्या भारतीय राज्यघटनेचा अभिमान आहे. आपली भारतीय लोकशाही चार आधार स्तंभांवर उभी आहे- विधिमंडळ, नोकरशाह, न्यायसंस्था आणि प्रसार माध्यमे. लोकशाहीची शक्ती या चारही स्तंभांच्या सामर्थ्यावर अवलंबून असते, आणि हेच आधारस्तंभ एकमेकांना पूरक हवेत. कोणताही अस्थिर आधारस्तंभ लोकशाहीच्या रचनेला कमकुवत क...