सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..
मुंबई २५ मे २०२५: भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्या कथित अवमानाचे प्रकरण आता अधिकच गुंतागुंतीचे झाले असून, या प्रकरणाची पुढील दिशा मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या फौजदारी RIT याचिकेवरील सुनावणीवर अवलंबून आहे. विशेषतः, सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी दाखल केलेल्या याचिकेला निष्प्रभ करण्यासाठी "मनुवाद्यांकडून" कट रचल्याचा आरोप सुप्रीम कोर्टाचे एडवोकेट नितीन सातपुते यांनी केला आहे आणि या प्रकरणाला जातीय वळण मिळाले आहे. सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांच्यामार्फत एडवोकेट शोभा बुद्धिवंत यांची फौजदारी RIT याचिका* भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम महाराष्ट्रात प्रवेश केला असता त्यांना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्टाचार प्रोटोकॉल पाळण्यात आला नसल्याने केवळ ते बौद्ध समाजातील व्यक्ती असल्याकारणाने महाराष्ट्र शासनाने त्यांना जाणीवपूर्वक प्रोटोकॉल दिला नाही. या गंभीर घटनेची दखल घेत, समाजसेवी वृत्तीचे सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांच्यामार्फत एडवोकेट शोभा बुद्धिवंत यां...