Posts

Showing posts from January, 2024

नवी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जनतेसाठी खुला प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते उद्घाटन

Image
नवी मुंबई - प्रधान मंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईत देशातील सर्वात मोठ्या सागरी पुल अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूचे आज उद्घाटन झाले. हा जगातील 12वा तर देशातील सर्वात मोठा सागरी पुल आहे. यामुळे मुंबईच्या वाहतूकीत मोठा बदल होणार आहे. इतकेच नाही तर मुंबईचे नवी मुंबई, पुणे, गोवा आणि दक्षिणेकडील राज्यांचे अंतर कमी होणार आहे. शिवडी-न्हावा-शेवा अटल सेतूची पायाभरणी डिसेंबर 2016 मध्ये मोदींच्या हस्ते ठेवण्यात आली होती. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) 17 हजार कोटी रुपये खर्चून या जवळपास 22 किमी लांबीच्या सेतूची उभारणी केली आहे. त्यातील 16 किमीचा भाग समुद्रावर असून देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी पूल ठरला आहे. 21.8 किमीचा सेतू असून त्यापैकी 16.5 किमी समुद्रावर तर 5.5 किमी जमिनीवर आहे. देशातील सर्वात लांब सागरी सेतू म्हणून हा सेतू ओळखला जाईल. या सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर फक्त 20 मिनिटांत पार करता येणार आहे. अटल सेतूवरून 100 किमी प्रतितास वेगाने प्रवास करता येणार आहे. अवजड वाहने, दुचाकी, रिक्षा, ट्रॅक्टर यांना या मार्गावरुन परवानगी नसेल. अट...

उलवे नगरी मध्ये बौद्ध धम्म परिषद संपन्न

Image
उलवे रायगड -  बौद्ध धर्मामुळे भारत महान देश बनेल आणि 'मी सारा भारत बौद्धमय करीन' राष्ट्रनिर्माते डॉ बाबासाहेब यांनी संकल्प केला होता या संकल्पनेतून प्रथमच उलवे नवी मुंबई येथे भव्यदिव्य बौद्ध धम्म परिषद दि. ७ जानेवारी २०२४ रोजी प्लॉट क्र. ०१. सेक्टर २०, संविधान चौक येथे हजारोंच्या संख्येत संपन्न झाली. या परिषदेला, द बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव य. आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी त्यांनी, उपस्थितांना संबोधित केले. त्याचबरोबर बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून डॉ. एस. आर. इंदवंस महाथेरो यांची विशेष उपस्थिती होती. तसेच या बौद्ध धम्म परिषदेला देश विदेशातील भिक्खुसंघ व भिक्खुणी संघासह देशभरातून अनुयायी ही हजारोंच्या संख्येत उपस्थित होते. तसेच वामनदादा वाघमारे अध्यक्ष सचिन गवळे अरुण झनकार प्रा भोसले वनिता कांबळे सचिव बौद्ध धम्म परिषद उलवे, उपासक ,उपासक अरुण झंकार ,आदी कार्यकर्त्यांनी बौद्धधम्म परिषद यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मोलाचे सहाय्य केले व हि धम्म परिषद सफलता पूर्वक पार पाडली.

नेरूळ विभागातील उद्यान अधिकारी श्री दीपक रोहेकर यांचा समारोप

Image
नेरूळ - नवी मुंबई शहरातील गजबजलेल्या अशा नेरूळ नगरातील उद्यान अधिकारी श्री दीपक रोहेकर यांची घनसोली घणसोली विभागात पदभार देण्यात आला. साधारणता त्यांच्या पाच वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी नेहरू नगरातील अनेक उद्यानांचा कायापालट केला व काळजीपूर्वक लक्ष देऊन नेरूळ सेक्टर 11 मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे परिवर्तन केले व अत्यंत मनमोहक व सुशोभनीय उद्यानांमध्ये या उद्यानाची ख्याती निर्माण केली. नवी मुंबई शहरातील सर्वात मोठे नगर म्हणून नेरूळ या नगराची विभागाचे नोंद केले जाते या विभागात एकूण 36 उद्याने आहेत त्यापैकी अनेक उद्यानांचा त्यांनी विकास केला प्रसंगी या उद्यानात येणाऱ्या शेकडो नागरिकांनी त्यांच्या कामाची स्तुती केली व त्यांची प्रशंसा केली व नवीन वर्षाची सुरुवात होत असताना जेव्हा नागरिकांना उद्यान अधिकारी यांची घणसोली विभागात बदली झालेली असल्याची बातमी समजतात त्यांनी त्यांना समारोप दिला व नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या याप्रसंगी नवी मुंबईतील समाजसेवक श्री सुदत्त खरात , युवा नेतृत्व तेजस फणसे , परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतीक यादव व सुरक्षारक्षक संदेश निकाळजे हे ...