Posts

नवी मुंबई ऐरोली मधील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात 11 हजारहून अधिक नागरिकांनी केले अभिवादन

Image
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर जनसागर ओसंडून वाहत असतो. येथे महाराष्ट्राच्या विविध भागांतून तसेच देशाच्या विविध राज्यांतून व परदेशातूनही नागरिक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठया संख्येने उपस्थित राहत असतात. या नागरिकांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली, नवी मुंबई येथील ज्ञानस्मारक म्हणून नावाजल्या जाणा-या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची माहिती मिळावी व चैत्यभूमीवर येणा-या नागरिकांनी ऐरोली येथील ज्ञानस्मारकाला आवर्जून भेट द्यावी या करिता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे यांच्या नियंत्रणाखाली चैत्यभूमीवर ज्ञानस्मारकाची माहिती प्रसारित करणारा स्टॉल प्रदर्शित करण्यात आला आहे. काल रात्रीपासूनच या स्टॉलला भेट देण्यास नागरिकांनी सुरुवात केली असून आज सायं.7 वाजेपर्यंत 30 हजाराहून अधिक नागरिकांनी माहिती जाणून घेतली आहे. ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री.गणेश नाईक यांनी याठिकाणी भेट देत अभिवादन केले. याम...

येथे कर माझे जुळती ..ज्ञानाच्या अथांग सागरास कोटी कोटी प्रणाम..भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विनम्र अभिवादन..

Image
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना #महापरिनिर्वाणदिन निमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनम्र अभिवादन केले. यावेळी त्रिशरण बुद्धवंदना पार पडली. मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. माजी खासदार नरेंद्र जाधव यांच्या 'भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. एक उत्तुंग अभ्यासक, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, समाजसुधारक आणि राजकीय दूरदृष्टी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्या राष्ट्रासाठीचे योगदान अतुलनीय आहे. त्यांची दृष्टी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाची होती. ते  जातीयवादापासून मुक्त राष्ट्र पाहू इच्छित होते. प्रत्येक व्यक्तीला शिक्षण आणि विकासाची समान संधी मिळेल यासाठी त्यांचे प्रयत्‍न होते. त्यांच्या दृष्टिकोनामुळेच भारतीय समाजातील अस्पृश्यता आणि भेदभावाच्या विरोधात महत्वपूर्ण सुधारणा घडल्य...

आकाशदीप मागासवर्गीय संस्था आणि इतर संस्थांचा समूह यांनी महापरिनिर्वाण दिनी भिम अनुयायांसाठी केले अन्न व पाण्याचे मोफत वाटप

Image
मुंबई, शुक्रवार, 6 डिसेंबर 2024: महापरिनिर्वाण दिनानिमित्त, दादर येथील चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क मैदान येथे भिम अनुयायांसाठी विशेष सेवा देण्यात आली. या उपक्रमाचे आयोजन उल्हासनगर येथील राजहंस कलादिप शैक्षणिक, सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा आशा प्रदीप जाधव, नवी मुंबई येथील आकाशदिप मागासवर्गीय शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष प्रदीप शिवराम जाधव, तसेच ठाणे येथील हर्षकल्याण शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष माया कल्याण जाधव यांनी केले होते. कार्यक्रमादरम्यान अडीच हजार भिम अनुयायांना मोफत बिस्किटे, चिवडा आणि बिस्लेरी पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले. लाखो लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येथे जमले होते. या मोठ्या गर्दीत या सेवेमुळे अनुयायांना मोठा दिलासा मिळाला. सामाजिक उपक्रमाच्या यशस्वितेसाठी स्थानिक स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला. उपस्थित अनुयायांनी आयोजकांची प्रशंसा केली आणि त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल आभार मानले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने अनुयायांच्या मनामध्ये एक वेगळा ठसा उमटवला आहे. ...