लेखिका मानसी चापेकर यांच्या लेखणीतून - असमाधानी समाधान
#असमाधानी_समाधान लेखिका= मानसी चापेकर पूर्वी मोठी माणसं म्हणायची की अंथरूण पाहून पाय पसरावेत ..मात्र हल्ली म्हटलं जातं की कधीतरी अंथरूण ही मोठे करा की!! म्हणजे पूर्वी मोठी माणसं आपल्याला समाधानी रहा हे समजावून सांगायची आणि आता मात्र माणसांच्या गरजाच इतक्या वाढल्या आहेत ...की त्यांनी स्वतः वाढवल्या आहेत माहीत नाही. पूर्वी दोन खोल्यांमध्ये एकत्र कुटुंब पद्धतीत आठ आठ नऊ नऊ माणसं सुद्धा राहायची आणि आजकाल नवरा बायको, त्यांचा एक मुलगा किंवा मुलगी किंवा जास्तीत जास्त दोन मुलं यांसाठी पाच-सहा खोल्या असतात. लहानपणापासून (हो कारण सासू-सासरे वगैरे सोबत नकोच असतात एक तर ते वेगळे असतात किंवा वृद्धाश्रमात) त्या मुलांना स्वतंत्र बेडरूम दिली जाते मग त्यांना सवय होते एकटेपणाची... मग त्यांना सवय होते सगळं काही स्वतःपुरतं ठेवायची. आपल्याला आजकाल कितीही मिळालं तरी समाधान होतच नाही.माझी आई म्हणायची की पन्नास हजार रुपये पगार सुद्धा कमी पडेल आणि 5000 सुद्धा पुरेल अशी असते एकेकाची परिस्थिती. आपल्या नेमक्या गरजा काय आहेत ...एखादी वस्तू आपल्याला अगदीच तातडीची आहे का... ही असते गरज ...पण माझ्याक...