शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत क वर्ग महानगरपालिकांमध्ये नवी मुंबई संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नंबर वन
मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2022’ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘क’ वर्ग महानगरपालिकांच्या गटात नवी मुंबई महानगरपालिकेस राज्यात प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. मुंबईतील एनसीपीए सभागृहात नगरविकास दिनाचे औचित्य साधून आयोजित विशेष समारंभात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हा राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार स्विकारला. याप्रसंगी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष ना.ॲड.राहुल नार्वेकर, शिक्षणमंत्री ना.श्री.दिपक केसरकर, मुख्य सचिव श्री. मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव नगरविकास (2) श्रीम. सोनिया सेठी, अप्पर मुख्य सचिव नगरविकास (1) श्री. भुषण गगराणी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. इकबाल चहल आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार स्विकारताना आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, शहर अभियंता श्री. संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबा...