Posts

Showing posts from March, 2025

आरपीआयए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली उत्तर मध्य मुंबई अध्यक्ष राजेश कटारे यांच्या उपोषणाला यश.....पंचशील नगर चेंबूर येथे अग्निशमन दलाची इमारत खाली करण्याची नोटीस.. ६०० कुटुंबांचा लढा आणि संविधानाचा विजय

Image
मुंबई, २७ मार्च २०२५: चेंबूरच्या अमर महल परिसरातील पंचशील नगर येथील एस.आर.ए. (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) बिल्डींगमध्ये गेल्या दहा वर्षांपासून अग्निशमन यंत्रणा बंद असल्याने या इमारतीत राहणाऱ्या ६०० कुटुंबांचे जीवन धोक्यात आले होते. या गंभीर समस्येकडे अनेकदा तक्रारी करूनही विकासक आणि एस.आर.ए. प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने अखेर अग्निशमन विभागाने इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयामुळे सहाशे कुटुंबांना रस्त्यावर येण्याची वेळ आली होती. मात्र, या अन्यायाविरुद्ध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया A आरपीआय ए उत्तर मध्य मुंबईचे अध्यक्ष राजेश कटारे यांनी प्रशासन आणि विकासकांविरोधात आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आणि सात दिवसांच्या अथक लढ्यानंतर त्यांना यश मिळाले. दहा वर्षांचा उपेक्षित प्रश्न पंचशील नगरातील एस.आर.ए. बिल्डींगमध्ये अग्निशमन यंत्रणा बंद असल्याची समस्या गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित होती. या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी वेळोवेळी विकासक आणि एस.आर.ए. प्रशासनाकडे तक्रारी नोंदवल्या होत्या. मात्र, या तक्रारींकडे दुर्लक्ष झाले आणि अग्निसुरक्षेसंदर्भात कोणतीही ...