महाराष्ट्र शासन नवीन मंत्रिमंडळ झाले स्थापन.. मंत्रिमंडळात महिलांना मिळाली तुरळक खाती आणि दुय्यम दर्जा
Maharashtra Cabinet Minister Post List: राज्य मंत्रिमंडळाचे बहुप्रतिक्षित खातेवाटप काल (21 डिसेंबर)ला जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे गृह आणि सामान्य प्रशासन (जीएडी), ऊर्जा (नवीनीकरण ऊर्जा वगळून), विधी व न्याय आणि माहिती-जनसंपर्क ही खाती असतील. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे वजनदार खाती देण्यात आली आहे. शिंदेंकडे नगरविकास आणि गृहनिर्माण तर अजित पवारांकडे अर्थखात्यासह उत्पादन शुक्ल विभागाचीही जबाबदारी दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे नगरविकास खात्यासह गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम-एमएसआरडीसी), तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे वित्त व उत्पादन शुल्क खाते असणार आहे. तर महसूल खाते चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले आहे. कोणाला कोणते खाते मिळाले, संपूर्ण यादी- कॅबिनेटमंत्री- - देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, लाॅ ॲंड ज्युडीशिअरी - एकनाथ शिंदे - नगरविकास, गृहनिर्माण - अजित पवार - अर्थ, राज्य उत्पादन - चंद्रशेखर बावनकुळे - महसूल - रा...