नवीन सुविधांनी युक्त वंडर पार्क नेरूळ येथील उद्यानाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नूतनीकरण सोहळा उद्घाटन
दिनांक 30 मे रोजी नवी मुंबर्ई महानगरपालिकेच्या वंडर्स पार्क उद्यानाचे नुतनीकरणाचा लोकार्पण, कोपरखैरणे व ऐरोली येथील टर्शिअरी ट्रिटमेंट प्लांट, वाशीतील महात्मा फुले बहुद्देशीय इमारतीचे लोकार्पण तसेच सानपाडा येथील मध्यवर्ती ग्रंथालयाचे भूमीपूजन दुरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. वंडर्स पार्क येथील अँम्पी थिएटरमध्ये झालेल्या कार्यक्रमास पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री व आमदार गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, माजी महापौर जयवंत सुतार, स्थानिक माजी नगरसेवक रवींद्र इथापे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी वंडर्स पार्कमधील नवीन खेळण्याची पाहणी केली. विकास कामे केलेल्या अभियंता व इतर संबंधितांचा यावेळी गौरव करण्यात आला. महापालिका आयुक्त श्री. नार्वेकर व शहर अभियंता संजय देसाई यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी म...